निवडणूक आयोगाकडून आज (दि.15) दुपारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले असून, (Mahavikas Aghadi) यात झारखंडसह महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची (Maharashtra Assembly Election) घोषणा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या सर्व घडामोडींमध्ये जागा वाटपाच्या चर्चांनी जोर धरला असून, लोकसभेत 10 पैकी 8 जागांवर विजय मिळवलेला पवार गट विधानसभेत फक्त 75 जागा लढवणार असल्याचे सांगितले जात आहे. शरद पवारांची (Sharad Pawar) ही गुगली सर्वांनाच बुचकळ्यात टाकणारी असल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. (Mahavikas Aghadi Seat Sharing Formula For Assembly Election)
Mahavikas Aghadi महाविकास आघाडीत कुणाला किती जागा?
समोर आलेल्या माहितीनुसार आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणपुकांसाठी महाविकास आघाडीतील (MVA) जागा वाटपाचा फॉर्मुला जवळपास निश्चित झाल्याची चर्चा आहे. त्यानुसार त्यानुसार मविआत काँग्रेसला सर्वाधिक 119 ठाकरे गटाला 86 तर, शरद पवार गटाला 75 अशा पद्धतीने जागांचे वाटप केले जाणार आहे. तर शेकापला 3, समाजवादी पक्ष 3 आणि कम्युनिस्ट पक्षाच्या वाट्याला 2 जागा येणार आहेत.
Mahavikas Aghadi मीच महाराष्ट्राला योग्य रस्त्यावर आणणार
अजित पवारांच्या राष्ट्रावादी पक्षाचे नेते रामराजे निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे निंबाळकर यांनी काल (दि.14) शरद पवार गटात प्रवेश केला. त्यांच्याबरोबर फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांनीदेखील अजितदादांची साथ सोडत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शरद पवार यांनी पुढील दिशा स्पष्ट केली.
शरद पवार म्हणाले, काही मुलांनी एक बोर्ड हातात घेतला होता. त्यात माझा फोटो होता. त्यात लिहीलं होतं की 84 वर्षांचा म्हातारा. तुम्ही काळजी करू नका. आपल्याल लांब जायचंय. 84 वर्षांचा होतो की 90 वर्षांचा. हे म्हातारं महाराष्ट्राला योग्य रस्त्यावर आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. मला मागील साठ वर्षात एक दिवसही तुम्ही सुट्टी दिली नाही. महाराष्ट्राचा चेहरा बदलवण्याची माझी जबाबदारी असल्याचे पवारांनी म्हटले होते. त्यानंतर आता मविआतील जागा वाटपाचा फॉर्मुला समोर आला आहे, ज्यात पवारांनी फक्त 75 जागा लढवणार असल्याचे म्हटले आहे. पवारांची या खेळामागे काय राजकारण आहे याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.