तंत्रज्ञानामुळे रोजच्या दैनंदिन घडामोडींत मोठा बदल झाला आहे. पारंपरिक व्यवसाय आणि रोजगाराच्या क्षेत्रांतही बदल झाले आहेत. कृषी क्षेत्रही याला अपवाद नाही. आज शेतीत असे अनेक नवे उद्योग आले आहेत ज्यामुळे ग्रामीण भागात रोजगाराचे साधन उपलब्ध झाले आहे. गावात तुम्ही सरकारच्या मदतीने माती तपासणी केंद्र सुरू (Soil Health Card Scheme) करू शकता. याद्वारे तुम्हाला उत्पन्नाचे साधन आणि रोजगार उपलब्ध होईल तसेच शेतकऱ्यांनाही त्यांच्या शेतातील माती किती कसदार आहे याची माहिती होईल.
आजही देशात अनेक ठिकाणी माती तपासणी केंद्र उपलब्ध नाहीत. आज शेतीत (Agriculture) अनेक बदल झाले आहेत. पेरणी करण्याआधी शेतकऱ्यांना माती परिक्षणाचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. यावरून शेत जमिनीत कोणत्या घटकांचे प्रमाण किती आहे. जमिनीची सुपीकता कशी आहे. खतांची मात्रा किती प्रमाणात द्यायला हवी याची माहिती मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तुम्ही एखादे माती परीक्षण केंद्र गावात सुरू करू शकता.
Soil Health Card Scheme काय आहे सरकारी योजना
केंद्र सरकारने सन 2015 मध्ये सॉइल हेल्थ कार्ड योजना सुरू केली होती. देशातील गावागावात माती परिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे. गावात माती परीक्षण केंद्र सुरू करण्यासाठी येणाऱ्या एकूण खर्चापैकी 75 टक्के खर्च सरकारकडून दिला जातो. या योजनेअंतर्गत तुम्ही माती परिक्षणाचे दुकान सुरू करू शकता किंवा एखाद्या वाहनावर माती परिक्षणासाठी लागणारी उपकरणे ठेऊन गावागावात सेवा देऊ शकता.
मोठी बातमी! अखेर राज्यपाल नियुक्त आमदारांचा तिढा सुटला
Soil Health Card Scheme फक्त याच लोकांना मिळेल फायदा
सोईल हेल्थ कार्ड स्कीमचे लाभार्थी बनण्यासाठी तुमचे वय 18 ते 40 दरम्यान असले पाहिजे.
उमेदवार किमान दहावी उत्तीर्ण असला पाहिजे.
उमेदवाराला ॲग्री क्लिनिक बरोबरच शेतीचीही चांगली माहिती असणे आवश्यक आहे.
उमेदवार शेतकरी कुटुंबातील असला तर आणखी फायद्याचे ठरेल.
गावात केंद्र सुरू करण्यासाठी जिल्हा कृषी कार्यालयात जाऊन संपर्क साधून पुढील प्रक्रिया करता येईल.
माती परीक्षण प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी तुमच्याकडे जागा असणे आवश्यक आहे. स्वतःचे किंवा भाडोत्री घर असावे. तुम्हाला वाहनात केंद्र सुरू करायचे असेल तर त्या पद्घतीने वाहन असणे गरजेचे आहे.
Soil Health Card Scheme अर्ज कसा कराल
या योजनेत केंद्र सुरू करायचे असेल तर soilhealth.dac.gov.in या वेबसाईटला भेट द्या. येथे तुम्हाला अधिक माहिती मिळू शकेल. या योजनेत कृषी अधिकाऱ्यांकडून अर्ज घ्या. सर्व अर्ज व्यवस्थित भरा. या अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडा. नंतर हा अर्ज कृषी विभागात जमा करा. या व्यतिरिक्त तुम्ही किसान कॉल सेंटर (18001801551) या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून योजनेबाबत सविस्तर माहिती घेऊ शकता.
Soil Health Card Scheme खर्च किती येईल
तज्ज्ञांच्या मते माती परीक्षण प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी साडेचार लाख ते पाच लाखांपर्यंत खर्च येऊ शकतो. परंतु केंद्र सरकारच्या सॉइल हेल्थ कार्ड योजनेत एकूण खर्चाच्या 75 टक्के रक्कम केंद्र सरकार देणार आहे. अशा पद्धतीने 3.75 लाख रुपये सरकार देईल तुम्हाला फक्त 1.25 लाख रुपये गुंतवावे लागतील.