सध्या आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे वारे राज्यात वाहत आहे. (IAS Promotion) या पार्श्वभूमीवर राज्यात कधीही आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तवली आहे. अशामध्ये एकीकडे राज्य सरकार आपल्या निर्णयांचा पाऊस पडत आहेत, दुसरीकडे राज्यात अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि बढती पाहायला मिळत आहे. नुकतेच राज्य सरकारने राज्यसेवेतील 23 अधिकाऱ्यांना IAS पदी बढती देण्याचा निर्णय घेतला. 1954 च्या बढतीद्वारे नियुक्तीच्या नियमानुसार भारतीय प्रशासकी सेवा नियम, या राज्यसेवेतील अधिकाऱ्यांना IAS पदी देण्यात आली. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने 23 अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना IAS पदी बढती देण्यात आली आहे. (IAS Promotion of 23 officers of state service list)
IAS Promotion हे आहेत IAS पदी बढती मिळवणारे अधिकारी
- संजय ज्ञानदेव पवार
- नंदकुमार चैतराम भेडसे
- सुनील बजाजीराव महिंद्रकर
- रवींद्र जीवाजीराव खेबुडकर
- निलेश गोरख सागर
- लक्ष्मण भिका राऊत
- जगदीश गोपाळकृष्ण मनियार
- माधवी समीर सरदेशमुख
- बाळासाहेब जालिंदर बेलदार
- डॉ. जोत्स्ना गुरुराज पडियार
- आण्णासाहेब दादू चव्हाण
- गोपीचंद्र मुरलीधर कदम
- बापू गोपीनाथराव पवार
- महेश विश्वास आव्हाड
- वैदही मनोज रानडे
- विवेक बन्सी गायकवाड
- नंदिनी मिलिंद आवाडे
- वर्षा मुकुंद लड्डा
- मंगेश हिरामन जोशी
- अनिता निखील मेश्राम
- गितांजली श्रीराम बाविस्कर
- दिलीप ज्ञानदेव जगदाळे
- अर्जुन किसनराव चिखल
सोमवारी (14 ऑक्टोबर) यासंदर्भात आदेश जारी करण्यात आले आहेत. राज्याकडून 23 अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला होता. याच प्रस्तावाच्या अनुषंगाने सोमवारी केंद्र शासनाकडून या पदोन्नतीचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. महसूल सेवेतील अप्पर जिल्हाधिकारी यांना ही पदोन्नती देण्यात येते. दरम्यान, 2023 च्या निवड यादीच्या आधारे ही नियुक्ती करण्यात आली आहे. रिक्त जागांसाठी ही निवड 1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीतील करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच, नियुक्त झालेले सर्व अधिकारी महाराष्ट्र संवर्गात पुढील आदेश येईपर्यंत कार्यरत राहणार आहेत. तसेच, ते प्रोबेशन पिरियडवर असतील असे या आदेशामध्ये नमूद केले आहे.