राज्याचे माजी आदिवासी विकासमंत्री मधुकराव पिचड (Madhukar Pichad) यांच्याबाबत मोठी बातमी आहे. मधुकरराव पिचड यांना ब्रेनस्ट्रोक आला आहे. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मधुकर पिचड यांच्यावर नाशिकमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पहाटेच्या सुमारास त्यांना ब्रेन स्ट्रोक आल्याची माहिती आहे. अकोले तालुक्यातील राजूर येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांना मेंदूविकाराचा झटका आला. यानंतर त्यांना तातडीने नाशिकमधील 9 पल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पाच वर्षांपूर्वी मधुकरराव पिचड आणि त्यांचे पुत्र माजी आमदार वैभव पिचड यांनी राष्ट्रवादीला काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला होता. वैभव पिचड यांनी भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढली. मात्र या निवडणुकीत डॉ. किरण लहामटे यांनी त्यांचा पराभव केला होता. आता विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. याचा विचार करून काही दिवसांपूर्वी त्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात पसरली होती. यामुळे पिचड पिता पुत्र लवकरच महाविकास आघाडीत प्रवेश करतील अशी चर्चा सुरू झाली आहे.
सध्या पिचड कुटुंबीय भाजपात आहे. महायुतीत अकोले विधानसभेची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुटत आहे. त्यामुळे पिचड कुटुंबियांनी राष्ट्रवादीची तुतारी हाती घेण्याची तयारी केल्याचे सांगितले जात आहे. मधुकरराव पिचड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून राजकारणाला सुरुवात केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी मुलगा वैभव पिचड यांच्यासह भाजपात प्रवेश केला. या निवडणुकीत वैभव पिचड भाजपाच्या तिकीटावर मैदानात होते. परंतु, किरण लहामटे यांनी त्यांचा पराभव केला.
मधुकर पिचड आणि वैभव पिचड यांनी याआधीही शरद पवारांची भेट घेतली होती. राष्ट्रवादीत प्रवेशाची इच्छा व्यक्त केली होती. याआधी सन 2019 मध्ये मधुकरराव पिचड आणि वैभव पिचड यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला होता. मात्र यावेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीत वैभव पिचडांना पराभव स्वीकारावा लागला होता. भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले जिल्हा परिषद सदस्य किरण लहामटे यांना लॉटरी लागली. या निवडणुकीत त्यांनी वैभव पिचड यांचा पराभव केला होता.
Madhukar Pichad कोण आहेत मधुकर पिचड ?
मधुकर पिचड नगर जिल्ह्यातील दिग्गज नेते आहेत. सन 1980 ते 2004 या काळात पिचड आमदार म्हणून सलग सात वेळा निवडून आले आहेत. मार्च 1995 ते जुलै 1999 या काळात महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. मधुकर पिचड त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य होते. परंतु, 2019 मध्ये त्यांनी मुलासह भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे.