10.8 C
New York

Eknath Shinde : मुंबईतील पाचही टोल नाक्यांवर हलक्या वाहनांना टोल माफी: शिंदेंची घोषणा

Published:

विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वसामान्य वाहन चालकांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईतील पाच टोलनाक्यांवर छोट्या वाहनांना संपूर्ण टोलमाफीचा निर्णय घेण्यात आला आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून अंमलबजावणी होणार आहे. (Chief Minister Eknath Shinde big announcement in state cabinet maharashtra political updates).

विधानसभा निवडणुकीच्या आधी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महायुती सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आलाय. वाशी, ऐरोली, मुलुंड,दहिसर आणि ठाणे येथील टोलनाक्यावर हलक्या वाहनांना संपूर्ण टोलमाफी करण्यात आली आहे. आज रात्रीपासूनच टोलमाफीचा आदेश देण्यात आलाय. विधानसभेच्या तोंडवर हा निर्णय घेण्यात आला असला तरी सर्वसामान्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.

मुंबई हावडा एक्सप्रेसला बॉम्बस्फोटाची धमकी

Eknath Shinde कोणत्या पाच टोलनाक्यांवर टोलमाफी…

ऐरोली
वाशी
दहिसर
मुलुंड-एलबीएस
आनंदनगर

Eknath Shinde याआधी सरकारने कोणकोणते निर्णय घेतले?

राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू शकतो. त्याआधी राज्य सरकार महत्त्वाचे निर्णय घेत आहे. समाजातील वेगवेगळ्या घटकांना आकर्षित करण्यासाठी याआधी महायुती सरकारने महायुती सरकारने अनेक लोकप्रिय निर्णय घेतले आहेत. सरकारने राज्यातील होमगार्ड्सचे मानधन जवळपास दुप्पटे केले आहे. या निर्णयाचा जवळपास 50 हजार होमगार्ड्सना फायदा होणार आहे. यासह सरकारने राज्यातील अनेक आयटीआय संस्थांची नावे बदलली आहेत. या संस्थांना महापुरुषांची नावे देण्यात आली आहेत. राज्य सरकारने राज्यातील मदरशांत शिकविणाऱ्या शिकक्षांचे मानधनही दुप्पट केले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img