10.8 C
New York

 Pune Metro : खडकवासला ते हडपसर अन् नळस्टॉप ते माणिकबाग मेट्रोने जाता येणार

Published:

आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईकरांना टोल माफीचा निर्णय देऊन खूश करण्यात आले आहे. त्याप्रमाणे बैठकीत पुणेकरांची वाहतूक कोंडींतून सुटका व्हावी यासाठीदेखील एक निर्णय घेण्यात आला आहे. आजच्या बैठकीत मंत्रिमंडळाने पुणे मेट्रो रेल टप्पा-२ मधील रेल्वे मार्गिंकांच्या कामांना मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरच नागरिकांना खडकवासला ते हडपसर अन् नळस्टॉप ते माणिकबाग येथे मेट्रोने प्रवास करून जाता येणार आहे. या निर्णयानंतर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांनी महायुती सरकारचे आभार मानले आहेत.

 Pune Metro शहरातील मेट्रोचे जाळे आणखी भक्कम होणार – मोहोळ

कॅबिनेटच्या निर्णयानंतर मुरलीधर मोहळ यांनी एक्सवर पोस्ट करत मेट्रोच्या नव्या दोन मार्गिकांबद्दल माहिती दिली आहे. यात त्यांनी खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी आणि नळस्टॉप-डहाणूकर कॉलनी-वारजे-माणिकबाग या दोन मेट्रो मार्गांना महायुती सरकारने कॅबिनेट बैठकीत मंजुरी दिल्याचे नमुद केले आहे. या निर्णयामुळे पुणे शहरातील मेट्रोचे जाळे आणखी भक्कम होणार असल्याचा विश्वास मोहळ यांनी व्यक्त करत पुण्याच्या सार्वजनिक वाहतुकीच्या सक्षमीकरणासाठी निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवी आणि अजितदादा पवार यांचे मनःपूर्वक धन्यवादही मोहळ यांनी मानले आहेत.”

मंत्रिमंडळाचे धडाकेबाज 19 निर्णय

 Pune Metro पुण्यात आणखी नवे दोन मेट्रो मार्ग !

१) खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी

२) नळस्टॉप-डहाणूकर कॉलनी-वारजे-माणिकबाग

या दोन मेट्रो मार्गांना महायुती सरकारने कॅबिनेट बैठकीत मंजुरी दिली असून यामुळे पुणे शहरातील मेट्रोचे जाळे आणखी भक्कम होणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img