महाराष्ट्र सरकारने स्वप्नील कुसळेने (Swapnil Kusale) पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० मीटर रायफल ३ पोझिशनमध्ये कांस्यपदक जिंकलं होतं. त्यानंतर २ कोटी रूपये बक्षीस देण्याची घोषणा केली होती. परंतु, या रकमेवर स्वप्नीलचे वडील नाराज होते व त्यांनी स्वप्नीलला ५ कोटी रूपये आणि पुण्यात घर देण्याची मागणी सरकारकडे केली होती. परंतु, सरकारने आपल्या निर्णयावर ठाम राहून स्वप्नीलला आज २ कोटी रूपये बक्षीस देऊन सन्मानित केलं आहे.
स्वप्नील कुसाळेने ७२ वर्षांनंतर महाराष्ट्रासाठी ऑलिम्पिक पदक जिंकलं. स्वप्नीलचे वडील सुरेश कुसाळे यांनी काही दिवसांपूर्वी स्वप्नीलला देण्यात येणाऱ्या बक्षीसाची रक्कम वाढवावी अशी सरकारकडे मागणी केली होती. स्वप्नीलला ५ कोटी रुपये मिळायला हवेत व बालेवाडी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सजवळ फ्लॅट मिळावा जेणेकरून त्याला सहज सराव करता येईल. त्याचबरोबर पुण्यातील ५० मीटर थ्रो पोझिशन रायफल शूटिंग मैदानाला आपल्या मुलाचं म्हणजेच स्वप्नील कुसाळेचं नाव देण्यात यावं अशी स्वप्नीलच्या वडीलांची मागणी होती.
थोरात-कोल्हेंनी कितीही जोर लावला तरी ‘विखे पाटलांचा’ किल्ला अभेद्यच!
यावेळी त्यांनी हरियाणा सरकारचं उदाहरण दिलं होतं. हरियाणा सरकारने ऑलिम्पिक पदक विजेत्यांना ५ कोटी रुपये दिले. त्यांनी हरियाणा सरकारने दिलेल्या बक्षीसाची तुलना महाराष्ट्र सराकारच्या धोरणाशी केली. सरकारने सुवर्णपदक विजेत्याला ५ कोटी रुपये, रौप्यपदक विजेत्याला ३ कोटी रुपये आणि कांस्यपदक विजेत्याला २ कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती.
सुरेश कुसळे म्हणाले, “महाराष्ट्रला या स्पर्धेत केवळ एक पदक मिळाले असताना हे प्रमाण कशासाठी? आत्तापर्यंतच्या पदक विजेत्यांपैकी स्वप्नील ऑलिम्पिक पदक जिंकणारा महाराष्ट्राचा केवळ दुसरा खेळाडू आहे. त्यामुळे त्याला ५ कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात यावं.” अशी सुरेश कुसाळे यांची मागणी होती.