10.8 C
New York

ST Bus : प्रवाशांना मोठा दिलासा! एसटी महामंडळाची हंगामी दरवाढ रद्द…

Published:

एसटी महामंडळाने (ST Bus) ऐन दिवाळीत प्रवाशांना मोठा दिलासा दिलायं. यंदाच्या वर्षी हंगामी दरवाढ रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने घेतलायं. यासंदर्भातील परिपत्रक महामंडळाकडून काढण्यात आले आहे. त्यामुळे आता प्रवाशांना सध्या सुरु असलेल्या तिकीटीच्या दरानूसारच प्रवास करता येणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून निर्णयांचा धडाका सुरु आहे. उद्या राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता असल्याने राज्य मंत्रिमंडळाची आज सकाळपासूनच मॅरेथॉन बैठक सुरु आहे. या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह राज्यातील सर्वच मंत्री उपस्थित आहेत. या बैठकीमध्ये राज्य सरकारकडून जनतेच्या हितार्थ निर्णय घेण्यात येत असून त्यापैकीच एक म्हणजे एसटी महामंडळाची हंगामी दरवाढ रद्द करण्यात आलीयं.

ST Bus सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा

दरवर्षी दिवाळीला अनेक लोक आपल्या घरी जातात. त्यासाठी लाखो लोक रेल्वेने तर लाखो लोक परिवहन महामंडळाच्या बसने प्रवास करतात. तसेच बरेच जण सुट्यामुळे पर्यटनस्थळी फिरण्याचे नियोजन करतात. या दरम्यान झालेली गर्दीचा फायदा उचलत खासगी ट्रॅव्हल्सकडून भरमसाठ भाडेवाढ केली जाते. त्याचवेळी दरवर्षी एसटी महामंडळाकडून 10 टक्के हंगामी भाडेवाढ केली जाते. यंदाही ही भाडेवाढ 25 ऑक्टोबर ते 24 नोव्हेंबर दरम्यान करण्याचे परिपत्रक काढण्यात आले. परंतु विधानसभा निवडणुकीमुळे राज्यातील जनतेची नाराजी निर्माण होऊ नये म्हणून भाडेवाढ रद्द करण्यात आली. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

ST Bus कोणत्याही बसमध्ये भाडेवाढ नसणार

एसटीने हंगामी भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय घेतल्यामुळे महामंडळाच्या तिजोरीत जमा होणारी अतिरिक्त रक्कम यंदा जमा होणार नाही. एसटीला दिवाळीच्या काळात चांगले उत्पन्न मिळते. यावर्षीही उत्पन्न वाढीसाठी हा मार्ग स्वीकारला होता. परंतु आता भाडेवाढ करण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. आता विठाई, शिवशाही, निमआराम बसेससाठी भाडेवाढ लागू असणार नाही.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img