आपल्या उत्तम अभिनयाने बॉलीवूड तसेच मराठी प्रेक्षकांवर अधिराज्य करणारे अभिनेते अतुल परचुरे (Atul Parchure) यांचे नुकतेच निधन झाले. वयाच्या अवघ्या ५७ व्या वर्षी अतुल यांनी जगाचा निरोप घेतला. अतुल यांनी अनेक बॉलीवूड व मराठी सिनेमांमध्ये काम केले आहे. तसेच अनेक काळ रंगभूमीवर देखील त्यांनी आपली चुणूक दाखवली. त्यांच्या जाण्याने मराठी सिनेविश्व हळहळत आहे.