10.8 C
New York

Cabinet Meeting : शिंदे सरकारच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत अत्यंत मोठा निर्णय

Published:

आज महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक जाहीर होणार आहे. (Cabinet Meeting) केंद्रीय निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेत याबाबतची घोषणा करण्याची शक्यता आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक पार पडली या बैठकीत धारावी पुनर्विकासाबाबत अत्यंत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील 125 एकर जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देण्यात येणार आहे. देवनार डंपिंग ग्राऊंडची 125 एकर जागा धारावी प्रकल्पाला दिली जाणार आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

Cabinet Meeting शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत टोलमाफीचा निर्णय

शिंदे सरकारच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत टोलमाफीचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईत प्रवेश करणाऱ्या टोल नाक्यांवर संपूर्णपणे टोल माफी देण्यात येणार आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

घेतलेला निर्णय निवडणुकीपुरता नाही, याची खात्री द्या; टोल माफीवर राज ठाकरेंची पोस्ट

Cabinet Meeting मंत्रालयात नागरिकांची गर्दी

आचारसंहिता लागण्याच्या आधी कामांना मंजुरी मिळवून घेण्यासाठी नागरिकांनी मंत्रालयाबाहेर गर्दी केली आहे. शेवटच्या कॅबीनेटमध्ये सरकार कामांना मंजुरी देईल, असा आशावाद नागरीकांना आहे. आचारसंहिता लागण्याअगोदर मंत्रालयीन काम व्हावीत यासाठी सकाळपासून मंत्रालयाच्या बाहेर रांगा लागल्या आहेत. सकाळी 6 पासून सामान्य नागरिक पासच्या रांगेत उभे आहेत. गेले अनेक दिवस आम्ही मंत्रालयात काम व्हावी यासाठी येतोय, पण कामं होत नाहीत. आचारसंहिता लागण्याची लक्षणं आहेत. ही शेवटची कॅबिनेट असेल अशी शक्यता आहे. म्हणून आमची काम व्हावीत म्हणून आम्ही सकाळपासून आलो आहोत. किमान आज तरी काम व्हावं, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img