महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्याबाबत प्रसारमाध्यमांत खोटी बातमी पसरली होती. समीर खान यांचा काही दिवसांपूर्वी भीषण अपघात झाला होता. या अपघातात समीर खान जखमी झाले होते. मुंबईतील प्रसिद्ध क्रिटीकेअर रुग्णालयासमोर त्यांच्याच ड्रायव्हरने त्यांच्यावर गाडी घातली होती. यानंतर मागील काही दिवसांपासून समीर खान यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती नाजूक असल्याचे सांगण्यात येत होते. यानंतर त्यांच्या निधनाचीही बातमी पसरली होती.
मात्र आता स्वतः नवाब मलिक यांनीच (Nawab Malik) खुलासा केला आहे. माझ्या जावयाच्या प्रकृतीबाबत चुकीची माहिती प्रसारमाध्यमांत प्रसारीत झाली होती. काल त्यांची तब्बेत नाजूक होती. परंतु, आता त्यांच्या प्रकृतीत सुधाारणा होत आहे. तेव्हा चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवू नका, असे आवाहन नवाब मलिक यांनी केले आहे.
Nawab Malik कसा झाला होता अपघात?
समीर खान आणि त्यांची पत्नी हे दोघे त्यांच्या घराजवळ असणाऱ्या क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये रेग्युलर चेकअपसाठी गेले होते. चेकअप झाल्यानंतर दोघेही बाहेर आले. यानंतर समीर यांनी ड्रायव्रला गाडी घेऊन येण्यास सांगितलं. यावेळी ड्रायव्हरकडून गाडी आणताना चुकून ब्रेक ऐवजी एक्सलेटर पाय पडला आणि गाडी जोरात येऊन समीर खान यांना धडकली. यामध्ये समीर खान गे मल्टिफॅक्टर झाले होते. त्यांच्या शरीरावर आणि डोक्याला अनेक जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर ऑपरेशन देखील पार पडले होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्यांची प्रकृती नाजूक असल्याचे सांगण्यात येत होते.
पदाधिकारी मेळाव्यात नक्की काय म्हणाले राज ठाकरे
त्यांच्या मेंदूतील गाठ आणि बरगडी, खांदा, मानेला फ्रॅक्चर झाले होते. कुर्ला येथील क्रिटीकेअर रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले होते की समीर खान यांची प्रकृती गंभीर आहे. त्यानंतर मात्र काल त्यांच्या प्रकृतीबाबत खोट्या बातम्या पसरू लागल्या होत्या. आता या प्रकारावर नवाब मलिक यांनीच खुलासा केला आहे.
मलिक म्हणाले, समीर खान यांच्या प्रकृतीबाबत चुकीची माहिती पसरवली जात आहे. त्यांची प्रकृती काल गंभीर होती. परंतु, आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. कृपय अशा प्रकारच्या अफवा पसरवू नका. आम्ही सर्वांच्या प्रार्थना आणि पाठिंब्याबद्दल आभारी आहोत. सर्वांनी संयम बाळगावा. योग्य माहिती मिळाल्याशिवाय कोणतीही अफवा पसरवू नये. समाीर खान यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करा आणि कुटुंबाला पाठिंबा द्या असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.