राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddiqui) यांचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. लिलावती रुग्णालयात बाबा सिद्दीकी यांच्यावर उपचार सुरु होते. 15 दिवसापूर्वी जीवे मारण्याची धमकी बाबा सिद्दीकी यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांना वाय दर्जाची सुरक्षाही देण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करत आतापर्यंत दोन आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, या प्रकरणात आता राजकारणाला सुरूवात झाली आहे. विरोधीै पक्षांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
सिद्दीकी यांच्या मृत्यू प्रकरणाचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यात येईल अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली. एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक या प्रकरणाचा तपास करणार असल्याचीही माहिती मिळाली आहे.हा खटला आपण फास्टट्रॅक कोर्टात चालवण्याची विनंती करून अशा प्रकारच्या गुन्हेगारांना जरब बसेल अशी कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत.
मोठी बातमी! बाबा सिद्दीकींची गोळी झाडून हत्या
बाबा सिद्दीकींवर तीन व्यक्तींकडून गोळीबार करण्यात आला होता. 12 ऑक्टोबर (शनिवारी) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्यांचा मुलगा आणि आमदार झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) यांच्या ऑफिस बाहेर त्यांच्यावर गोळीबार झाला होता. ही घटना मुंबईच्या बांद्रा पूर्वेत खैर नगर परिसरात घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार माहितीनुसार एसआरए प्रकल्पातून झाला आहे.
फटाके वाजवत असताना हा गोळीबार झाला. लिलावती रुग्णालयात झिशान सिद्दीकी तसेच अभिनेता संजय दत्त उपस्थित होते. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील रुग्णालयात संपर्क साधला होता. रुग्णालायाच्या परिसरात कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने जमा झाले होते. शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास बाबा सिद्धिकी कार्यालयातून बाहेर पडले तेव्हा कार्यालयासमोर फटाके वाजवत होते. अचानक तीन जण गाडीतून उतरले आणि बाबा सिद्धिकी यांच्यावर तीन राऊंड फायर केले.
कार्यालयाजवळील राम मंदिराजवळ हा गोळीबार झाला. या गोळीबारात बाबा सिद्धिकी यांना एक गोळी लागल्यानंतर सिद्दीकी खाली कोसळले. त्यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आला होते. परंतु, त्यांचा मृत्यू झाला.