8.8 C
New York

Rahul Gandhi : बाबा सिद्दिकींच्या हत्येवर राहुल गांधींचा सरकारवर हल्लबोल

Published:

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. करनैल सिंह आणि धर्मराज कश्यप या दोन मुख्य आरोपींना या गोळीबाराप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. सध्या बाबा सिद्दिकी यांचे मुंबईतील कूपर रुग्णालयात पोस्टमॉर्टम सुरू आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा अलर्ट मोडवर आली असून फरार आरोपीच्या शोध घेण्यासाठी पाच ते सहा पथक तयार करण्यात आली आहेत. दरम्यान, राज्यासह देशभरातील राजकारण्याची प्रतिक्रिया याप्रकरणी आता समोर येत आहेत. नुकताच लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी बाबा सिद्दिकी यांच्या हत्येवर प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी यांनी यावेळी सरकारने बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी स्विकारावी, असे म्हटले.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक्सच्या माध्यमातून बाबा सिद्दिकी यांच्यावर हत्येवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यानुसार, “धक्कादायक आणि दुःखदायक बाबा सिद्दीकीजी यांचं निधन आहे. या कठीण काळात माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबासोबत आहेत. या भीषण घटनेने महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असल्याचं दिसून येत आहे.

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर शरद पवारांची मोठी मागणी

Rahul Gandhi नेमका गोळीबार कसा झाला?

शनिवारी रात्रीच्या सुमारास ही गोळीबाराची घटना घडली. बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन व्यक्तींनी पूत्र झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोर गोळीबार केला. या प्रकरणात दोघांना ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणातील तिसऱ्या आरोपीची ओळख पोलिसांना पटल्याची माहिती समोर येत आहे. करनैल सिंह आणि धर्मराज कश्यप अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. तर तिसऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत असून, त्याच्या तपासासाठी जवळपास पाच ते सहा पथक गुन्हे शाखेकडून तयार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. बाबा सिद्दिकी हे त्यांचे पुत्र आणि आमदार झिशान सिद्दिकी यांच्या वांद्रे पूर्व परिसरातील खेरनगर येथील कार्यालयाजवळ थांबले होते. यावेळी अज्ञात व्यक्तींनी सिद्दिकी यांच्यावर गोळीबार केला. लिलावती रुग्णालयात गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या सिद्दिकी यांना तातडीने दाखल करण्यात आले. परंतु, त्यांचा मृत्यू झाला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img