राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांची काल मुंबईत हत्या करण्यात आली. या हत्येनंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका केली. या घटनेची फक्त चौकशीच नको तर जबाबदारी स्वीकारून पदावरून दूर व्हा, अशा शब्दांत पवारांनी महायुतीच्या (Mahayuti) नेत्यांना फटकारले. यावर आता फडणवीसांची प्रतिक्रिया आली आहे.
शरद पवारांना केवळ सत्ताच पाहिजे आहे. इतकी गंभीर घटना झाल्यानंतरही त्यांच्या नजरेसमोर फक्त खुर्ची आहे, असा टोला फडणवीसांनी लगावला. बाबा सिद्दीकींची काल मुंबईतील वांद्रे या ठिकाणी हत्या झाली. ते वांद्रे येथील खेरवाडी सिग्नलजवळील झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयात चालले होते, त्यावेळी तीन अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारानंतर सिद्दीकी यांच्यावर हल्ला करणाऱ्या तिघांपैकी दोघांना पोलिसांनी अटक केली.
ना युती, ना आघाडी मनसेचं इंजिन स्वबळावर..; राज ठाकरेंचं ठरलेलंच सांगितलं
दरम्यान, आज माध्यमांशी बोलतांना फडणवीस म्हणाले, बाबा सिद्दीकी आणि माझी चांगली मैत्री होती. त्यांच्या निधनाची बातमी अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायक आहे. बाबा सिद्दिकींशी माझी जवळची मैत्री होती. अनेक वर्ष आम्ही सोबत काम केलेलं आहे. त्यामुळं त्यांच्या हत्येच्या घटनेममुळे आम्हा सगळ्यांनाच धक्का बसला, असं ते म्हणाले. पुढं बोलतांना ते म्हणाले, याप्रकरणातले दोन आरोपींना पकडण्यात आलं. अजून तपास सुरू आहे. काही धागेदोरे पोलिसांना मिळालेत. त्यातील काही अॅंगल्सही आम्ही तपासत आहोत. यासंदर्भात पोलीस माध्यमांना योग्य ती माहिती देतील, असे फडणवीस म्हणाले होते.
सिद्दीकींच्या हत्येनंतर पवारांनी फडणवीसांचा राजीनामा मागितला. त्यावरही फडणवीसांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, मला असं वाटतं की, त्यांना (शरद पवार) केवळ सत्ताच पाहिजे आहे. इतकी गंभीर घटना झाल्यानंतरही त्यांच्या नजरेसमोर फक्त खुर्ची आहे, आमच्या नजरेसमोर महाराष्ट्र आहे. आम्हाला महाराष्ट्राकडे पाहायचं आहे, महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. प्रगती साधायची आहे आणि महाराष्ट्र सुरक्षित ठेवायचाय. त्यामुळे त्यांना जर खुर्चीकडे पाहायचं असेल आणि बोलायचं असेल तर त्यांनी ते बोलावं, असं फडणवीस म्हणाले.
Devendra Fadnavis शरद पवार काय म्हणाले होते?
राज्यातील ढासळलेली कायदा व सुव्यवस्था ही चिंतेची बाब आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली हे दुःखद आहे. गृहमंत्री आणि सत्ताधारी एवढ्या सौम्यतेने राज्याचा गाडा हाकणार असतील तर सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. याची केवळ चौकशी नको तर जबाबदारी स्वीकारू सत्ताधाऱ्यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याची गरज आहे. बाबा सिद्दीकी यांच्याप्रती भावपूर्ण श्रद्धांजली अपर्ण करतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करतो, असं फडणवीस म्हणाले.