18.8 C
New York

India vs Bangladesh : बांग्लादेशचा सुपडा साफ! तिसरा सामना जिंकत भारताने साकारला मालिका विजय

Published:

भारत आणि बांग्लादेश यांच्यातील (India vs Bangladesh) तिसऱ्या टी 20 सामन्यातही टीम इंडियाने बांग्लादेशचा पराभव (Team India) करत मालिका जिंकली. या मालिकेत बांग्लादेशचा सुपडा साफ झाला. या संघाला एकही सामना जिंकता आला नाही. भारतीय संघाने 3-0 अशा फरकाने मालिका जिंकली. काल विजयादशमीच्या दिवशी हा सामना होता. या दिवशी भारतीय संघाच्या खेळाडूंनी बांग्लादेशचा (Bangladesh) पराभव करत विजयाचं सोनं लुटलं.

हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात संजू सॅमसन (Sanju Samson) संघाच्या विजयाचा हिरो ठरला. संजूने 47 चेंडूत धुवाधार 111 धावा केल्या. कर्णधार सूर्यकुमार यादवनेही 75 धावा केल्या. तर गोलंदाजीत रवी बिश्नोई आणि मयंक यादवे दोन-दोन विकेट्स घेतल्या. सूर्यकुमार यादवे नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अभिषेक शर्मा फक्त चार धावा करून बाद झाला. यानंतर संजू सॅमसन आणि सूर्यकुमार यादव या दोघांत 173 धावांची मोठी भागीदारी झाली.

सॅमसनने बांग्लादेशची गोलंदाजी अक्षरशः फोडून काढली. दुसऱ्या बाजूला सूर्यकुमारने वेगात फलंदाजी करत 75 धावा चोपल्या. यानंतर हार्दिक पांड्या आणि रियान पराग यांनीही फंलदाजीचा वेग कायम राखला. हार्दिकने 47 तर रियानने 34 धावा केल्या. बांग्लादेशकडून तनजिम हसन साकिबने तीन विकेट घेतल्या. या सामन्यात मात्र भारतीय संघाचंच वर्चस्व राहिलं.

भारताने दिलेल्या 298 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बांग्लादेशच्या फलंदाजांना विशेष काही करता आलं नाही. मयंक यादवच्या पहिल्याच चेंडूवर परवेज हुसैन इमाम बाद झाला. 59 धावांपर्यंत बांग्लादेशचे तीन सलामीचे फलंदाज तंबूत परतले होते. अशात लिटन दास आणि तौहीद हृदय यांच्यात 53 धावांची- भागीदारी झाली. लिटनने 025 चेंडूत 42 तर तौहीदने 65 धावा केल्या.

पहिल्या तीन ओव्हर्समध्येच बांग्लादेशने सामना गमावला होता. कारण संघाला 18 चेंडूत 160 धावांची गरज होती. ही गोष्ट निव्वळ अशक्य होती. ज्यावेळी वेगात फलंदाजी करण्याची गरज होती तिथे अखेरच्या पाच ओव्हर्समध्ये फक्त 31 धावा करता आल्या. खराब फलंदाजीमुळे बांग्लादेशला 133 धावांच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला.

India vs Bangladesh भारताने केले मोठे रेकॉर्ड

भारतासाठी हा सामना स्मरणीय राहणार आहे. कारण या सामन्यात संघाने महत्वाचे विक्रम केले. भारत टी 20 क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा दुसरा संघ ठरला आहे. याबाबतीत फक्त नेपाळचा संघ भारताच्या पुढे आहे. नेपाळने मंगोलिया विरुद्ध 314 धावा केल्या होत्या. संजू सॅमसन भारतासाठी टी 20 सामन्यात वेगवान शतक करणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. संजूने फक्त 40 चेंडूत शतक केले. संजूच्या आधी रोहित शर्मा आहे. रोहितने 2017 मध्य श्रीलंकेविरुद्ध फक्त 37 चेंडूंत शतक केले होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img