राज्यात येत्या काही दिवसात राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. त्यामुळे अनेक नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाताना दिसत आहे. तर दुसरीकडे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात) गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात नेत्यांची इनकमिंग होत आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पक्षात अजित पवार (Ajit Pawar) गटातील आणि भाजपमधून (BJP) अनेक नेते प्रवेश करत आहे.
नुकतंच भाजपने हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला आहे तर दुसरीकडे 14 ऑक्टोबर रोजी अजित पवार गटाचे रामराजे निंबाळकर (Ramraje Nimbalkar) देखील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश करणार आहे मात्र यापूर्वी पुन्हा एकदा शरद पवार यांनी भाजपला मोठा धक्का देत माजी आमदार चरण वाघमारे (Charan Waghmare) यांना पक्षात प्रवेश दिला आहे. तुमसर – मोहाडी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार चरण वाघमारे यांनी भाजप सोडून शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केल्याने निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.
शरद पवार यांनी या पक्ष प्रवेशाबद्दल माहिती देत फेसबुकवर (Facebook) लिहिले आहे की, भंडारा-गोंदिया यासारख्या अनेक जिल्ह्यांमध्ये एकेकाळी ज्यांनी ‘भारतीय जनता पार्टी’ उभी केली, त्यासाठी कष्ट केले अशा कष्टाळू सहकाऱ्यांना हळूहळू बाजूला केलं जातं आहे. एक काळ असा होता की महाराष्ट्रामध्ये ‘भारतीय जनता पार्टी’चा जन्म व्हायच्या आधी जनसंघ हा एक महत्त्वाचा विरोधी पक्ष होता. जनसंघाच्या काळात महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये कार्यकर्ते होते पण प्रभावी संघटक नव्हते, विधिमंडळात लोक नव्हते. त्या काळामध्ये जनसंघाची वाढ ही भंडारा जिल्ह्यातून सुरू झाली. त्याच्या आधीच्या काळामध्ये समाजवादी विचारांचे नेतृत्व हे तुमच्या भंडारा जिल्ह्यातून होती. अशोक मेहता किंवा तत्सम मोठे राजकीय नेते हे तुम्हा लोकांच्या भागातून निवडून यायचे. त्याचा अर्थ एकच होता सबंध महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा विचार आणि भंडारा जिल्हा जेव्हा एक होता तेव्हा त्या जिल्ह्यामध्ये एक वेगळी विचारधारा असायची. ती विचारधारा सामान्य कष्टकरी असो, अन्य घटक असो त्यांच्या प्रश्नांची मांडणी करणारा असा हा सगळा तुमचा भाग होता.
अलीकडच्या काळामध्ये तो विचार घेऊन काम करणारे म्हणून वाघमारे यांचा उल्लेख हा प्रकर्षाने केला जात होता. त्यांनी आयुष्याचा मोठा काळ हा भाजपमध्ये घालवला. दुर्दैवाने जुन्या काळातील भाजपा जो होता आणि आजचा भाजप यामध्ये दिवसेंदिवस फरक होत आहे. दहा एक दिवसांपूर्वी पार्लमेंटमध्ये एक भाजपाचे जेष्ठ नेते आमचे मित्र, सहज एक चर्चा करत असताना, गप्पागोष्टी चालू असताना… त्यांना एक गोष्ट सांगितली की गेले दोन महिने मी बघतोय महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये लोकांची आवक वाढलेली आहे. जे लोक येत आहेत त्यातील 80 % लोक भाजपमधून येत आहेत. म्हणून आमच्या मित्राला-सहकाऱ्याला विचारलं.. एक शिस्तीचा पुरस्कार, पक्ष निष्ठेची भूमिका हे ज्या पक्षाचे वैशिष्ट्य आहे त्या पक्षातून लोक बाहेर पडतात याचा मला आश्चर्य वाटतं. त्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं की, “पवार साहेब तुम्ही जुन्या विचारात आहात. जुन्या काळातील विचारांचा जनसंघ-भाजप त्यातील कार्यकर्ता संघटनेची चौकट, विचारधारा सोडून कधीही बाहेर जाणारा नव्हता. त्याचे कारण नेतृत्व तशा प्रकारचे होते, कार्यकर्त्यांचे सन्मान ठेवणारे होते, त्यांच्या मागे उभे राहणारे होते.
‘पवारांना फक्त खुर्चीच दिसते’; सिद्दीकींच्या हत्येनंतर राजीनामा मागताच फडणवीसांचा टोला
आज ती स्थिती संघटनेमध्ये आमच्याकडे राहिलेली नाही. त्याचा परिणाम जो आत्मविश्वास होता या पक्षात आल्यानंतर तो दिवसेंदिवस कमी व्हायला लागला. त्याचा परिणाम अनेक वेळेला संधी साधू लोक, ठराविक लोकांच्या हातामध्ये प्रवृत्ती या प्रश्नांमुळे लोक या पक्षातून बाहेर पडतायत.” हा अनुभव त्या भारतीय जनता पक्षातील एका नेत्याने मला स्वतःला सांगितलं. तेच तुम्हा सहकाऱ्यांबरोबर घडलं हे स्पष्ट होतं.
वाघमारे महाराष्ट्राच्या विधिमंडळात होते, या भागाचे प्रतिनिधित्व त्यांनी केलं. सामाजिक प्रश्नांची मांडणी केली आणि हे असं करत असताना ज्याचा उल्लेख त्यांनी केला ते परत मी करत नाही. पण त्यांना हा निर्णय घेण्याची स्थिती ज्या पक्षासाठी त्यांनी कष्ट केले त्या पक्षाच्या नेतृत्वाने आणली हे दुःखद आहे. म्हणून विचारपूर्वक राष्ट्रवादीचे राज्याचे अध्यक्ष जयंतराव पाटील यांच्यासोबत विचार विनिमय करून त्यांनी निर्णय घेतला राष्ट्रवादीमध्ये यायचा. आम्हा सगळ्यांच्या वतीने त्यांचे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे आम्ही अंत:करणापासून सहर्ष स्वागत करतो.
आज आपण एकत्र आलो निवडणुका अगदी तोंडावर आहेत. माझ्या माहितीप्रमाणे कदाचित शुक्रवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. सामान्यतः जयंतरावांची एक पद्धत आहे, कर्तुत्ववान लोकांची बांधिलकी असणारे कार्यकर्ते ज्या वेळेला पक्षात येतात त्यावेळेला संघटनेमध्ये काम करताना नवं-जुना वाद होऊ नये, कोणताही अंतर राहू नये, सगळ्यांना एकसंधपणे काम करता यावं या पद्धतीची रचना संघटनात्मक बदल करण्याची काळजी जयंतराव नेहमी घेत असतात. दोन दिवसातच कदाचित हा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता आहे तर थोडसं त्या कामाला विलंब लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
निवडणुका जाहीर झाल्या तर निवडणूक होईपर्यंत तुमची माझी सगळ्याची शक्ती जे कोणी पक्षाचे उमेदवार असतील त्या सगळ्यांना शक्ती देणे व सहकार्य करणे हे आपले कर्तव्य आहे. महाराष्ट्रामध्ये आम्ही तीन पक्ष एकत्र येऊन निवडणुकीला सामोरे जाण्याचे विचार करत आहोत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना आणि काँग्रेस पक्ष आम्ही तिघांनी एकत्र येऊन काम करण्याचे ठरवले आहे. काही जागांवर चर्चा आमच्या झाल्या आहेत. आज आम्हा सर्वांची प्रेस कॉन्फरंस आहे. निवडणुकीला सामोरे जाण्याची पद्धत, धोरणं ही आम्ही महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडणार आहोत व पुढच्या कामाची सुरुवात करणार आहोत.
तुमचा जिल्हा हा महाराष्ट्राच्या शेती क्षेत्रातील उत्तम काम करणारा जिल्हा आहे. ह्या जिल्ह्यात जसे उत्तम राजकीय कार्यकर्ते आहेत तसंच उत्तम शेतकरी देखील आहेत.अनेक लोकांचं शेती आणि तत्सम व्यवसायातील योगदान मी जवळून बघितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही सर्वजण आज राष्ट्रवादीमध्ये येत आहात. ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष’ हा शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक करणारा, त्यावर अधिक लक्ष केंद्रित करणारा, नव्या लोकांना संधी देणारा आणि समाजातील छोटे-मोठे जे सामाजिक वर्ग आहेत त्यांना बरोबर घेऊन सन्मानाने त्यांना प्रोत्साहन देणारा अशा विचारांचा हा पक्ष आहे.
आज तुम्हा सर्वांचं वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश होतोय. हा महत्त्वाचा निर्णय तुम्ही घेतला त्याबद्दल तुमचं मी अभिनंदन करतो, तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आणि हा विश्वास देतो की आपण जिवाभावाने सामान्य माणसांच्या हिताची जपणूक करण्यासाठी अखंडपणे काम करत राहू आणि ह्या कामात, आपल्यात कोणत्याही प्रकारचं अंतर पडणार नाही.