राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर येथील दसरा मेळाव्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. यंदा संघ 100 व्या वर्षात पदार्पण करत असल्याने या विजयादशमी सोहळ्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. (Mohan Bhagwat) या भाषणातून भागवत यांनी भारतीय समाजाला एकत्र येण्याची आणि सामूहिकपणे समाजाच्या कल्याणासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता व्यक्त केली. यावेळी त्यांनी राजकीय पक्षांचेही कान टोचले.
मोहन भागवत यांनी बहुदलीय प्रजातंत्रामध्ये सत्तेसाठी झालेल्या स्पर्धेवर भाष्य केलं. याबाबत त्यांनी अनेक जागतिक घटनांचा संदर्भ दिला, जसं की ‘अरब स्प्रिंग’ आणि बांग्लादेशातील ताज्या घडामोडी. भागवत म्हणाले की, भारताच्या चारही बाजूंवर अशा प्रकारच्या कुप्रवृत्त्या वाढत आहेत, ज्यामुळे समाजात असंतोष निर्माण होत आहे.
आजच्या युगात युवांना स्व गौरवाची जाणीव झाली आहे. हे चालू ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र येणं आवश्यक आहे. भारताला भविष्याचा मार्ग दाखवण्यासाठी सामाजिक समरसता आणि सद्भावना महत्त्वाची आहे असंही भागवत यावेळी म्हणाले. तसंच, स्वयंसंरक्षणाच्या महत्वावर लक्ष केंद्रित केले. गणेश विसर्जन मिरवणुकीत झालेल्या दगडफेकीच्या घटनांचा उल्लेख करताना, त्यांनी जनतेला सजग राहण्याचं आवाहन केलं. “पोलीस येईपर्यंत आपलं रक्षण करा,” असं त्यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर हे लक्षात घेऊन त्यांनी भारतीय समाजाला चेतावणी दिली की, कट्टरपंथी प्रवृत्त्या सक्रिय आहेत आणि त्यामुळे हिंदू समाजाने एकत्र येऊन आपली रक्षा करण्याची आवश्यकता आहे असंही ते म्हणाले.
काही लोक भाड्याने माणसं जमवून दसरा मेळावा घेतील
भारताच्या वाढत्या जागतिक प्रभावाबद्दल चिंता व्यक्त करताना, “भारत पुढे जाऊ नये, अशी काही लोकांची इच्छा आहे का? असा थेट प्रश्न उपस्थित केला. भागवतांनी सांस्कृतिक एकतेची महत्त्वता अधोरेखित केली, तसंच विविधतेच्या बाबतीत असंतोष निर्माण न करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. “सर्वांनी मिळून एकत्र राहून समाजाच्या समस्यांवर काम केलं पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
बहुपक्षीय लोकशाहीतील शासन प्रणालीमध्ये सत्ता प्राप्त करण्यासाठी दलांमध्ये स्पर्धा असते. जर समाजातील छोटे स्वार्थ, परस्पर सद्भावना किंवा राष्ट्राची एकता आणि अखंडता याहून अधिक महत्वाचे झाले. किंवा दलांच्या स्पर्धेत समाजाची सद्भावना आणि राष्ट्राचा गौरव गौण मानला गेला, तर अशा दलीय राजकारणात एक पक्षाची मदत करून पर्यायी राजकारणाच्या नावाखाली आपल्या स्वार्थी कार्यपद्धतीला पुढं आणणे हे राजकारणात सामान्य झालं आहे.
ही कल्पित कथा नसून, अनेक देशांमध्ये ही वास्तविकता आहे. पाश्चात्य जगातील प्रगत देशांमध्ये या मंत्रविप्लवामुळे जीवनाची स्थिरता, शांती आणि कल्याण संकटात आहे. तथाकथित “अरब स्प्रिंग”पासून ते बांग्लादेशातील ताज्या घटनांपर्यंत, या पद्धतीच्या कामगिरीचे स्पष्ट उदाहरण मिळते. भारताच्या चारही बाजूंना, विशेषतः सीमावर्ती आणि जनजातीय लोकसंख्येच्या प्रदेशांमध्ये अशा कुप्रयासांचे प्रमाण वाढले आहे, असंही भागवत यावेळी म्हणाले.