राज्यात अनेक भागांमध्ये (Rain Update) ऑक्टोबर हिटचा परिणाम जाणवू लागला आहे. तर, काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसत आहेत. दिवसभर कमालीचा उकाडा राज्यात ढगाळ वातावरण आणि कडक ऊन्हाचा तडाखा असे वातावरण निर्माण झाल्याने जाणवत आहे. राज्यात आज आणि उद्या काही भागांत हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
Rain Update कमी दाबाचा पट्टा
परतीचा मान्सून उत्तर भारतातून वेगाने पुढं महाराष्ट्रात आला आहे. पंरतु, तो नंदूरबारमध्येच अडखळला आहे. अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण आणि उकाडा असं वातावरण तयार झाले आहे. आज आणि उद्या रविवारी कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागांत हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढचे तीन दिवस रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आजपासून (12 ऑक्टोबरपासून) पुढील 5 दिवस म्हणजे 16 ऑक्टोबरपर्यंत मराठवाडा, खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर सोलापूर अशा 18 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात पावसाची शक्यता पुढील काही दिवस पुन्हा असल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत.
Rain Update विजांच्या कडकडाटांसह पाऊस
काल रात्री सात वाजण्याच्या सुमारास पुणे शहरात पावसाने हजेरी लावली. गेल्या काही दिवसांमध्ये दुपारी ऊन आणि संध्याकाळी पाऊस असं संमिश्र वातावरण दिसून येत होतं. अचानक विजांच्या कडकडाटांसह शहर परिसरात सरी कोसळल्या. राज्यामध्ये एकीकडे परतीच्या पावसाच्या सरी कोसळत आहे. तर, दुसरीकडे ‘ऑक्टोबर हीट’ जाणवत आहे.
या भागात यलो अलर्ट जारी
पालघर (12,13), ठाणे (12,13), रायगड (12,13), रत्नागिरी (12,13), धुळे (12,13), नंदूरबार (12,13), धुळे (12,13), नाशिक (12,13), पुणे (12,13), छत्रपती संभाजीनगर (12,13), कोल्हापूर (12,13), सातारा (12), जालना (12), बीड (12), अकोला (12), अमरावती (12), बुलडाणा (12,13), वर्धा (12,13), वाशिम (12,13), यवतमाळ (12,13)