7.5 C
New York

Raj Thackeray : आता वचपा काढण्याची वेळ, राज ठाकरेंनी शुभेच्छा देताना केलं ‘हे’ आवाहन

Published:

दसरा, विजयादशमीनिमित्त आज राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार आहेत. एकूण चार महत्त्वाचे दसरा मेळावे आज राज्यात होणार आहेत. यातील दोन दसरा मेळावे हे मराठवाड्यात तर दोन दसरा मेळावे मुंबईत होणार आहेत. याच निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सुद्धा पॉडरकास्टच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेसोबत संवाद साधून त्यांच्या मनातील भावना व्यक्त केली आहे. राज ठाकरे यांनी येणाऱ्या निवडणुकीबाबत मतदारांना महत्त्वाचे आवाहन करत बेसावध राहू नका, असे म्हटले आहे.

तर गेल्या इतक्या वर्षांपासून राजकारणी सोने लुटून नेत असतानाही सामान्य नागरिक मात्र बेसावध राहिले आहे.सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा. दर दसऱ्याला आपण सोने लुटतो, एकमेकांना शुभेच्छा देतो. महाराष्ट्राचं सोनं अनेक वर्षांपासून लुटलं जात आहे. आपण मात्र फक्त एकमेकांना आपट्याची पानं वाटतो. आपल्या हातात आपट्याच्या पानांशिवाय काहीच राहत नाही आणि बाकीचे सगळे सोने लुटून चाललेत. पण आपण मात्र, कधी स्वतःच्या आयुष्यात तर कधी जातीपातीत मशगुल असतो असंही ते म्हणाले आहेत.

पावसाचा जोर राज्यात पुन्हा परतीच्या वाढला

विजया दशमीनिमित्त पहिल्यांदाच पॉडकास्टवरून संवाद साधताना राज ठाकरे यांनी राज्यातील राजकारणावर आणि राजकारण्यांवर टीका करत तरुणांना विनंती केली आणि म्हणाले, ‘माझ्या महाराष्ट्रातील तरुणांनी, तरुणींना, शेतकऱ्यांनी, सगळ्यांनाच माझी हात जोडून विनंती आहे. दसऱ्यानंतर येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत तेव्हा बेसावध राहू नका.शमीच्या झाडावरची शस्त्र आता उतरवा. ही आता क्रांतीची वेळ आहे. ही वचपा घेण्याची वेळ आहे. आताच ती शस्त्र उतरवून तुम्हाला सर्वांचा वेध घ्यावा लागेल.’

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img