7.5 C
New York

Manoj Jarange : विधानसभेपूर्वी मनोज जरांगे यांचं मोठं विधान

Published:

मनोज जरांगे पाटील यांचा आज बीड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र नगद नारायणगड येथे पहिला जाहीर दसरा मेळावा होत आहे. या सभेत जरांगे पाटील यांनी विधानसभेपूर्वीच सरकारसह विरोधकांना मोठा इशारा दिला. आता मग दाखवतो यांना कचका. आता दाखवतो यांना कचका. नाटकं करतात व्हय. करोडोच्या संख्येने समुदाय न्यायासाठी लढत आहे. जो समुदाय न्यायासाठी लढतोय त्यांच्या बाजूने न्याय करणारे लोकं नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. जरांगे पाटील यांनी या ठिकाणी तडाखेबंद भाषण केले आहे.

Manoj Jarange जरांगे यांनी घेतला समाजाकडून शब्द

मला एकच वचन द्या, मला तुमच्याकडून जास्त काही नको. तुम्ही मला एकच वचन द्या. मग मी मात्र तुम्ही म्हणाल ते करेल. फक्त हट्ट धरू नका. एकच वचन द्या. जर आपल्या राज्यातील जनतेवर अन्याय झाला आणि एकदा सांगितलं हेच करायचं तर तुम्हाला तेच करावे लागेल, मला हे वचन द्या. मी कधीच तुमच्या शब्दाच्या पुढे जाणार नाही. पण मला तुमच्याकडून एकच वचन हवे. मला राजकारण आणि जातीचं या गडावरून बोलायचं नाही. तुमचं हित सोडून मी तुमच्या पुढे जाणार नाही, तुमचं काम सोडून जाणरा नाही हा गडावरून शब्द देतो. आता हातवर करून सांगा, माझी नजर पुरेल तिथपर्यंत हातवर करून सांगा. मला एकच वचन द्या, एकदा सांगितलं हेच करायचं तर तुम्हाला तेच करावे लागेल, असे ते म्हणाले.

‘दुर्दैवाने महाराष्ट्र लुटणाऱ्यांच्या पाठीशी राज ठाकरे’, राऊतांचा जोरदार पलटवार

Manoj Jarange संयम धरा, विजय नक्की आपलाच

मी तुमचे उपकार कधीच विसरणार नाही. तुम्हाला थोडं मोकळं सोडलं असतं ना तर तुम्ही भयानक कार्यक्रम लावला असता. मला काही लोक म्हटले आपण कधीच गप्प बसलो नाही. खरं आहे. आपण कधीच गप्प बसत नाही. आपण कर्माने क्षत्रिय आहे. आपण काय करायचं चालत राहायचं. मी चालत आहे. तुमचे लेकरं मोठी व्हावेत म्हणून मी सहन करतोय. नाही तर मी विचित्र प्राणी आहे. एखाद्या शब्दाची चूक झाली तर समाजाला ते सहन करावं लागेल. म्हणून मी गप्प बसतोय. नाही तर इथून हाणत हाणत निघालो तर गुजरात आणि हरियाणा, पानीपत आणि कटकपर्यंत हाणत हाणत जाणारा हा समाज आहे. तो समाज हा गप्प कसा आहे. आपल्याला टोकलं जात आहे. आपला विजय होत आहे. त्यामुळे संयम धरा. विजय नक्की आहे, असे ते म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img