8.3 C
New York

Air India Flight: तांत्रिक बिघाडामुळे जवळपास दोन तास हवेत घिरट्या… फ्लाइटमध्ये एकूण 140 प्रवासी

Published:

तामिळनाडूतील त्रिचीहून शारजाहला जाणारे एअर इंडिया विमान (Air India Flight) काही तांत्रिक बिघाडामुळे जवळपास दोन तास हवेत घिरट्या घालत होते. हे विमान पुढे जाऊ शकले नाही. अखेर विमान त्रिची विमानतळावर सुखरूप उतरले. एअर इंडियाचे फ्लाइट क्रमांक AXB613 शुक्रवारी (11 ऑक्टोबर) सायंकाळी 5.43 वाजता त्रिची विमानतळावरून उड्डाण केले. उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमानात तांत्रिक समस्या निर्माण झाल्या. त्यानंतर पायलटने विमान मागे वळवले. हे विमान जवळपास दोन तास आकाशात घिरट्या घालत होते. अखेर काही वेळाने विमान त्रिची विमानतळाच्या धावपट्टीवर सुखरूप उतरले.

विमानाने उड्डाण केल्यानंतर विमानाची चाके आत गेली नाहीत. वैमानिकाने वेगवेगळे प्रयत्न करूनही त्याला यश आले नाही. दरम्यान, वैमानिकाने त्रिची विमानतळ प्राधिकरणाशी संपर्क साधून विमानातील तांत्रिक बिघाडाची माहिती दिली. त्यानंतर पायलटला विमान मागे वळवण्यास सांगण्यात आले. विमान काही वेळ आकाशात घिरट्या घालत होते. त्यानंतर पायलटने विमान सुरक्षितपणे धावपट्टीवर उतरवले. दरम्यान, विमान धावपट्टीवर सुखरूप उतरल्यानंतर प्रवाशांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी वैमानिकांचे आभार मानले. तसेच वैमानिक विमानतळावरून त्यांच्या कारच्या दिशेने जात असताना काही माध्यमांनी त्यांचे फोटो आणि व्हिडिओ शूट करून ते सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावर नेटिझन्सनी ‘हाच खरा हिरो’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. या विमानाच्या मुख्य वैमानिकाचे नाव इक्रोम रिफादली फहमी झैनाल असून सहवैमानिकाचे नाव मैत्रेयी श्रीकृष्ण शितोळे आहे. इक्रोम आणि मैत्रेयी यांच्यावर लोकांकडून कौतुकाचा वर्षाव होतोय.

एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाचे शुक्रवारी रात्री तांत्रिक बिघाडामुळे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. त्यावेळी या फ्लाइटमध्ये एकूण 140 प्रवासी होते. जेव्हा विमानाच्या इमर्जन्सी लँडिंगची परिस्थिती असते तेव्हा हवेत प्रदक्षिणा घालून विमानाचे इंधन कमी केले जाते, जेणेकरून आपत्कालीन लँडिंग सोपे आणि कोणतेही नुकसान न होता. वृत्तानुसार, एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट IX 613 ने त्रिची विमानतळावरून संध्याकाळी 5.32 वाजता उड्डाण केले. पायलटने उड्डाण करताच त्याला लँडिंग गियरच्या हायड्रॉलिक सिस्टममध्ये बिघाड आढळला. यानंतर इमर्जन्सी लँडिंगची परवानगी मागण्यात आली. या काळात विमानाने हवेत 3 तासांपेक्षा जास्त वेळ घालवला आणि इंधन संपले. अग्निशमन दलासह 20 हून अधिक रुग्णवाहिकाही येथे तैनात करण्यात आल्या होत्या.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img