12.8 C
New York

Sanjay Raut : मुख्यमंत्र्यांनी तर अमित शाहांचा पूर्ण ताबा घेतला; संजय राऊतांची टोलेबाजी

Published:

मुख्यमंत्र्यांनी तर अमित शहाांचा पूर्ण ताबा घेतला आहे. अमित शहा हे फडणवीसांपेक्षा सध्याच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रेमात आहेत, (Sanjay Raut) असं दिसतंय. पण हे प्रेम नसून अफेअर आहे, ते कधीही तुटू शकतं असं वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांना महायुतीमध्ये कुणी विचारत नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांचा पूर्ण ताबा घेतला आहे. पूर्वी काँग्रेसचे एक नेते होते एस.पी. पाटील त्यांची ख्याती होती की ते मुंबईतून दिल्लीला सर्वात जास्त पैसा देत होते. यांचा रेकॉर्ड शिंदेंनी तोडला आहे असा टोलाही संजय राऊतांनी लगावला आहे. तसंच, मंत्रिमंडळात वाद ह्या बातम्यामध्ये बोलणं योग्य नाही. पण महायुतीमध्ये कधीच आलबेलं नव्हतं. फक्त शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडण्यासाठी, महाराष्ट्र कमजोर करण्यासाठी हे सरकार बनवलं गेलं असंही ते म्हणाले आहेत.

दोन-चार दिवसात जर आचारसंहिता लागणार हे सत्ताधारी सांगत असतील, तर आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू. भाजपवाले सांगतील तसेच होणार आहे, आमची निवडणुकीची संपूर्ण तयारी झाली आहे. फक्त EVM कुठे दाबून ठेवले आहेत बंद दाराआड त्यात काय घातले जात आहे हे आम्हाला तपासावं लागेल असंही राऊत म्हणालेत.

Sanjay Raut खर्च मुख्यमंत्री शिंदेंनी केला

लाडकी बहिण योजना ही राजकीय प्रेरित आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सांगतात, त्यांनी झारखंडमध्ये ही योजना राजकीय प्रेरित आहे असं म्हणत असतील तर तो न्याय महाराष्ट्रालाही लागू करायला हवा. अमित शहा यांना मराठी माणूस कमजोर करायचा आहे. 40 टक्के कमीशन खाणारे हे लोक आहेत, त्यांच्यामुळे त्यांच्या त्यांच्यात पटत नाही. हरियाणा निवडणुकीचा खर्च एकनाथ शिंदेंनी केला असा आरोपही त्यांनी केला आहे असा थेट आरोपच राऊतांनी केला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img