7.5 C
New York

Ladki Bahin Yojana : दसऱ्याच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना शिंदे सरकारची ‘सोनेरी’ भेट

Published:

राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता लागण्याची शक्यता असतानाच दुसरीकडे शिंदे सरकारने दसऱ्याच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना गिफ्ट दिले असून, लाडकी बहीण योजनेसाठी (Ladki Bahin Yojana) अर्ज करण्यास मुदत वाढ देण्यात आली आहे. या निर्णयानुसार आता लाडक्या बहीणी 15 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करू शकणार आहेत. (Ladki Bahin Yojana Application Date Extended)

Ladki Bahin Yojana अर्ज फक्त अंगणवाडी सेविकांमार्फतचं भरता येणार

ग्रामीण भागापासून ते शहरापर्यंत सगळीकडे सरकारच्या या योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. ज्यावेळी या योजनेची घोषणा करण्यात ाली त्यावेळी याचा लाभ घेण्यासाठी महिलांच्या लांबच्या-लांब रांगा लागल्याचे पाहण्यास मिळाले होते. त्यानंतर वाढता प्रतिसाद बघता सरकारने अ‍ॅप आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. त्यानंतर आता या योजनेच्या अर्ज भरण्यासाठीच्या मुदत वाढ देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ आतापर्यंत ज्या महिलांना मिळाला नाही, त्यांच्यापर्यंत लाभ पोहचवण्यासाठी ही मुदतवाढ देणात आली आहे. 5 ऑक्टोबर 2024 रात्री बारा वाजेपर्यंत या योजनेत अर्ज करता येणार असून, अर्ज फक्त अंगणवाडी सेविकामार्फतच भरावे लागणार आहे.

Ladki Bahin Yojana तिसऱ्यांदा वाढवण्यात आली मुदत

लाडकी बहीण योजनेचा अर्ज दाखल करण्याची मुदत वाढवण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. याआधीदेखील या योजनेचा अर्ज दाखल करण्यासाठी मुदत वाढ देण्यात आली आहे. योजना जाहीर झाल्यानंतर 1 जुलै 15 जुलै 2024 पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु त्यानंतर ती वाढवून 31 ऑगस्ट करण्यात आली. त्यानंतर ही मुदत वाढवून 30 सप्टेंबर करण्यात आली होती. आता पुन्हा तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली असून, योजनेसाठी 15 ऑक्टोंबर अर्ज दाखल करता येणार आहे.

Ladki Bahin Yojana लाडकी बहीण योजना सुपरहीट

आमचं सरकार लाडक्या बहिणींच्या मागे उभे रहाणारे सरकार आहे म्हणून आम्ही ऑक्टोबर व नोव्हेंबरचे पैसे लाडक्या बहिणींचे खात्यात एका क्लिकवर दिले आणि आमचं सरकार बहिणींच्या खात्यात हप्ते भरणारे सरकार आहे, हफ्ते घेणारे सरकार नाही असा टोला देखील त्यांनी विरोधकांना लावला.

सुप्रसिद्ध गायिका आशाताई भोसले यांनीदेखील विरोधकांना चांगली चपराक दिल्याचे म्हणत लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सुपरहिट झाली आहे आणि विरोधकांची तोंड काळी झाली आहे असे शिंदे म्हणाले होते. ही योजना यशस्वी राबवण्याची सरकारने जबाबदारी घेतली आहे आणि गरिबांच्या मुलांच्या तोंडचा घास हिरावू नका. या योजनेत कुणी खोडा घातला तर येणाऱ्या निवडणुकीत लाडक्या बहिणी तुम्हाला खोडा घातल्या शिवाय राहणार नाहीत असंदेखील शिंदे म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img