12.8 C
New York

RSS : लोकसभेची पुनरावृत्ती नको; RSS च्या भाजपला सुचना

Published:

विधानसभा निवडणुकांचं वारं वाहू लागलं आहे. विधानसभेसाठी जंगी तयारी सर्वच राजकीय पक्षांकडून केली जात आहे. काल भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) यांच्यात महत्वाची बैठक झाली. आरएसएसने भाजपला महत्वाच्या सूचना या बैठकीत दिल्या आहेत. निवडणुकीत जातीय समीकरण साधताना हिंदुत्वापासून लांब जाऊ नये. भाजपच्या जुन्या कॅडरच्या कार्यकर्त्यांकडं दुर्लक्ष नको, अशा सूचना नागपुरात संघ पदाधिकाऱ्यांच्यासोबतच्या बैठकीत भाजपला सूचना दिल्या आहेत. भाजपचे संगठन कामाला विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने लागले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भाजपच्या तयारी आणि नियोजनाचा आढावा घेत आहे.

समाज माध्यमांवर केवळ लाईक करून चालणार नाही. त्यावर कार्यकर्त्यांनी व्यक्त व्हायला हवे. लोकसभेच्या वेळेला विरोधकांकडून आरक्षणाबद्दल जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. जनतेतील संभ्रम अशा विषयांना तथ्यांवर आधारित उत्तरे देत दूर करण्यावर भर द्यावा, अशी सूचना देखील संघाकडून करण्यात आल्याची माहिती आहे.

लोकसभा निवडणूकीत ज्या बुथवर भाजपला मताधिक्य होतं, तेथील मतदानाची टक्केवारी कमी होती. तर भाजपला मताधिक्य नव्हते त्या बूथवर जास्त मतदान झालं. म्हणजेच भाजपचा मतदार असलेल्या भागातील लोक हव्या त्या प्रमाणात मतदान करायला बाहेर निघाले नाही किंवा भाजपला त्यांना मतदानकेंद्रांपर्यंत नेता आलं नाही. त्यामुळे मताधिक्य असलेल्या बुथवरील मतदानाचा टक्का वाढवा, असंही संघाकडून सांगण्यात आल्याची माहिती आहे.

RSS अनेक राजकीय भूकंप

गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनेक राजकीय भूकंप झाल्याचं पाहायला मिळालं आहे. सर्वात आधी शिवसेनेतील अंतर्गत बंडाळी, त्यानंतर सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळणं, शिंदेंनी भाजपच्या साथीनं महायुती सरकार स्थापन करुन स्वतः मुख्यमंत्रीपदी विराजमान होणं, त्यानंतर अजित पवारांच्या बंडानंतरची राष्ट्रवादीतील फूट, तसंच, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी थेट शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ठोकलेला दावा. यासर्व घडामोडी राज्याच्या राजकारणाला हादरे देणाऱ्या ठरल्या.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img