राज्यात विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. नेतेमंडळींनी चाचपणी सुरू केली आहे. (Chhagan Bhujbal) यातच छगन भुजबळांच्या येवला मतदारसंघाची चर्चा सुरू झाली आहे. या निवडणुकीत भुजबळांचे पुत्र समीर भुजबळ उमेदवारी करू शकतात अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. तसेच छगन भुजबळ राजकारणातून निवृत्ती घेणार असल्याच्याही चर्चा होत्या. यामुळे छगन भुजबळ यंदा निवडणूक लढणार नाहीत का असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु आता या घडामोडींवर स्वतः छगन भुजबळ यांनीच स्पष्टीकरण देत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. येवला मतदारसंघात मीच उमेदवारी करणार असे भुजबळ यांनी ठामपणे सांगितले आहे.
भुजबळ म्हणाले, सध्या कार्यकर्ते आणि पक्षाचा आग्रह आहे त्यामुळे येवला मतदारसंघातून मीच निवडणूक लढणार आहे. याआधी नांदगाव येथील एका कार्यक्रमात समीर भुजबळ यांना नांदगाव, नाशिक, मुंबई आणि महाराष्ट्राची जनता तुमची वाट पाहत आहे. समीर भुजबळ आता फ्रंटफुटवर येत आहेत त्यांना आशीर्वाद द्या असे छगन भुजबळ म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर छगन भुजबळ स्वतः निवृत्ती घेणार का अशी चर्चा सुरू झाली होती.
दसरा मेळाव्यावर परतीच्या पावसाचे विघ्न?
दरम्यान, छगन भुजबळ यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी फार इच्छुक नसल्याचं म्हटलं होतं. 1985 पासून मी राजकारणात आहे. आता नव्या पिढीनं जबाबदारी घ्यावी असं भुजबळ म्हणाले होते. मात्र त्यानंतर काहीच दिवसात त्यांची भूमिका बदलली आहे. विधानसभा निवडणूक लढण्याचे त्यांनी आता स्पष्टच सांगून टाकले आहे.
Chhagan Bhujbal भुजबळांविरोधात शरद पवारांचा उमेदवार कोण?
दुसरीकडे लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election 2024) शरद पवार यांच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून (NCP Sharad Chandra Pawar) विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शरद पवार (Sharad Pawar) येवला मतदारसंघात मोठा डाव टाकण्याची तयारी करत आहे. मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याविरोधात शरद पवार तगडा उमेदवार देणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
कुणाल दराडे (Kunal Darade) यांनी काही दिवसांपूर्वी भेट घेऊन येवला मतदारसंघासाठी उमेदवारी मागितली असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात येवला मतदारसंघात कुणाल दराडे यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळणार असल्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे.