पुण्यातील कल्याणीनगर येथील भीषण अपघाताची (Pune Crime) घटना अजूनही सर्वांच्या लक्षात आहे. आताही अशीच घटना पु्ण्यात घडली आहे. फक्त यावेळी ठिकाण (Pune News) बदललं आहे. पुण्यातील प्रसिद्ध कोरगाव पार्क परिसरात हिट अँड रनचा धक्कादायक प्रकार घडला आहे. भरधाव वेगातील कारने एका दुचाकीस्वाराला जोरदार धडक देत चिरडलं. या अपघातात एका 21 वर्षांच्या डिलिव्हरी बॉयचा मृत्यू झाला. कारचालक मात्र घटनास्थळावरून फरार झाल आहे. या घटनेने पुण्यात खळबळ उडाली आहे.
गुरुवारी मध्यरात्री कोरेगाव पार्क परिसरातील गुगल बिल्डिंगसमोर हा अपघात घडला. हा अपघात झाला त्यावेळी कारचालक नशेत असल्याचं सांगितलं जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लागलीच कारचालकाचा शोध सुरू केला. पण कारचालक घटनास्थळावरून फरार झाला होता. मात्र अथक परिश्रमानंतर पोलिसांनी त्याला हुडकून काढत अटक केली. हा कारचालक हडपसर येथील रहिवासी असल्याचे कळते. कार चालविताना तो खरंच नशेत होता का याचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही. पोलिसांनी तपासणी झाल्यानंतरच याबाबत माहिती मिळणार आहे.
दोन दिवसांत मुसळधार! पुणे-मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट
कारचालक गुरुवारी रात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास एबीसी रोडवरून ताडी गुता चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर होता. कारचा वेग जास्त होता. या कारने आधी एका अॅक्टिव्हाला धडक दिली. यामध्ये तिघे जण किरकोळ जखमी झाले. पुढे त्याच्या या कारची धडक दुचाकीस्वाराला बसली. यात दुचाकीस्वार खाली पडला. त्याला गंभीर दुखापत झाली होती. यानंतर कारचालक तेथून फरार झाला.
अपघातानंतर येथे असलेल्या स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत दुचाकीस्वाराला दवाखान्यात दाखल केले. मात्र येथे उपचारादरम्यान दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.