17 C
New York

Ajit Pawar : अजितदादांच्या ‘या’ अपूर्ण वाक्याची तुफान चर्चा

Published:

राज्याच्या राजकारणात पवारांचे मातब्बर घराणे म्हणून ओळखले जाते. राजकारणात घराण्याच्या तीन ते चार पिढ्या उतरल्या. पण घर अभेद्य होते. मात्र हे घर अजित पवारांच्या (Ajit Pawar) बंडामुळे फुटले. राष्ट्रावादीत उभी फुट पडल्यानंतर जे काही घडले ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. यानंतर आता अजितदादांनी केलेल्या एका अपूर्ण वाक्याची सध्या राजकीय वर्तुळात तुफान चर्चा होत आहे. ते बारामतीच्या एमआयडीसी परिसरातील तांबेनगरमध्ये बारामती डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात बोलत होते. (Ajit Pawar On Pawar Family And Political Crises)

Ajit Pawar रोहित पवारांच्या पाठीवर कौतुकाची थाप

उपस्थितांना मार्गदर्शन करताना अजितदादा म्हणाले की, सध्या राष्ट्रवादीचे दोन पक्ष झाले आहेत. आम्ही एकत्र होतो तोपर्यंत तुम्हाला कुणाला काहीच त्रास झाला नाही. मात्र, आता दोन पक्ष झाल्याने दोन्ही पक्षातील मंडळी तुम्हा सर्वांना येऊन भेटायला लागली आहेत. पहिले साहेब काम करायचे त्यांना तुम्ही पाठिंबा द्यायचा. त्यानंतर राजकारणाची गोडी मला होती म्हणून साहेबांनी माझ्यावर जबाबदारी टाकली. त्यानंतर सुप्रियालाही वाटलं आपण या क्षेत्रामध्ये यावं. गेल्या टर्मला रोहित पण आला. रोहितला म्हटलं तू आपल्या पुणे जिल्ह्यात नको शेजारच्या नगर जिल्ह्यात जा. कारण लोक म्हणती की यांच्याशिवाय कुणी दिसतयं की नाही. त्यामुळे त्याला कर्जत-जामखेडला पाठवल्याचे अजितदादा म्हणाले. तिथे त्याने चांगले काम केले अशी कौतुकाची थापही अजित पवारांनी रोहित पवारांच्या (Rohit Pawar) पाठीवर दिली.

Ajit Pawar मी साहेबांना सांगून भूमिका घेतली

पुढे बोलताना अजितदादा म्हणाले की, सगळं सुरळीत सुरू असताना मला काही वेगळी राजकीय भूमिका घ्यावी लागली. हा निर्णय मी साहेबांशी चर्चा करूनच घेतला. पहिल्यांदा साहेब हो म्हटले मग म्हणाले की हे काही मला पटतं नाही. हा त्यांचा नैतिक अधिकार आहे. कारण आम्ही सर्व त्यांच्या नेतृत्वाखाली पुढे गेलो आहोत. पण हे सर्व होत असताना आतापर्यंत तुम्हाला कधी त्रास झाला नाही कारण आम्ही परिवार म्हणून एक होतो. मात्र आता काय झाले दोन पक्ष झाले आहेत.

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचे ठिकाण बदलले,काय आहे कारण ?

Ajit Pawar अजितदादांचं अपूर्ण वाक्य काय?

सध्या दोन्ही बाजूंची पवार मंडळी सगळ्यांना येऊन भेटायला लागली, सगळ्यांची विचारपूस करायले लागले. काही जण निवडणुकीच्या प्रचारावेळीही यायची नाही. ते आता भेटी घेऊन साड्या, स्टीलची घमेले डब्बे द्यायला लागलेत. डब्बे रिकामे असतात पण टिफीनचे असतात असे अनेक गोष्टी माझ्या कानावर येत असतात असे दादा म्हणाले. ते कसे असते की एकीने केले की दुसरी लगेच हट्टाला पेटती लगेच ती करते.. ते म्हणतात ना पुरुष मंडळी आहेत तोपर्यंत घर एक असते, पण एकदा का काही… सध्या नवरात्र आहे. स्त्रीशक्तीचा आदर केला पाहिजे. मातृशक्तीचा जागर केला पाहिजे. त्यामुळे त्यांना सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो असे म्हणत अजितदादांनी त्यांचं वाक्य अपूर्णचं ठेवलं.

Ajit Pawar अन् पुन्हा विचार केला…

पुढे ते म्हणाले की, मी शांत असताना मनात येतं की हे काय चाललंय, कशा करता चाललंय? कुणाला काय मिळवायचंय असे अनेक प्रश्न येतात आणि त्यातून मला काही समजलं नाही. पण मी तर, पक्कमध्ये ठरवलं होतं की जाऊ दे मरू दे भरपूर केलं आहे पण, लोकांचा रेटा आणि हा काहीतरी करून दाखवेल हा आजपर्यंत तुम्हाला आलेला अनुभव या सर्व गोष्टींचा मी पुन्हा विचार करायला लागलो. नाही तर काही ठिकाणी मी काय सुतोवाच केलं होतं ते तुम्ही बघितल्याचे अजितदादा म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img