केंद्र सरकारने (Modi Government) मोठा निर्णय घेत क्षयरुग्णांना पौष्टिक आहारासाठी दिल्या जाणाऱ्या निक्षेपोषण योजनेच्या (Nikshay Poshan Yojana) रकमेत वाढ करण्यात आली आहे. या वाढीनंतर आता क्षयरुग्णांना निक्षे योजनेंतर्गत दरमहा एक हजार रुपये मिळणार आहेत. यापूर्वी ही रक्कम पाचशे रुपये होती. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अतिरिक्त सचिव आणि मिशन संचालक आराधना पटनायक (Aradhana Patnaik) यांनी याबाबत माहिती दिली आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर आता क्षयरुग्णांना नोव्हेंबर महिन्यापासून याचा लाभ होणार आहे. क्षयरोगाचा त्रास होत असताना रुग्णांना प्रथिने आणि पौष्टिक आहाराची अधिकाधिक गरज असते. मात्र आपल्या देशात क्षयरोगाचे बहुतांश रुग्ण गरीब कुटुंबातील असल्याने अनेक रुग्णांना पोषक आहार घेता येत नाही. त्यामुळे सरकारने निक्षय पोषण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत रुग्णाला पोषक आहार देण्यात येतो.
Nikshay Poshan Yojana काय आहे निक्षय पोषण योजना?
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी 1 एप्रिल 2018 मध्ये निक्षय पोषण योजना सुरु करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार केंद्र सरकारने देशातील क्षयरोग रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी निक्षय पोषण योजना 2024 मध्ये सुरु केली आहे. या योजनेअंतर्ग देशभरातील क्षयरोग ग्रस्त रुग्णांना आर्थिक मदत देण्यात येते. देशभरातील 13 लाख पेक्षा अधिक क्षयरोग रुग्णांना या योजनेचा फायदा होत आहे.
प्रत्येक रुग्णांना यापूर्वी या योजनेअंतर्गत 500 रुपये दरमहा देण्यात येत होते. मात्र आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत या योजनेअंतर्गत प्रत्येक रुग्णांना दरमहा 1000 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्याच्या फायदा नोव्हेंबर महिण्यापासून रुग्णांना मिळणार आहे. नॅशनल हेल्थ मिशननुसार देशात दरवर्षी 26 लाख लोकांना क्षयरोग होतो आणि अंदाजे 4 लाख लोक दरवर्षी या आजारामुळे मृत्यू पावतात.