11.9 C
New York

Country People Live The Longest : दीर्घकाळ जिवंत राहतात ‘या’ देशांतील लोक; जाणून घ्या

Published:

आजच्या काळात खूप कमी लोक असे आहेत जे शंभर वर्षे (Country People Live The Longest) जगतात. याच संदर्भात नुकताच एक अभ्यास करण्यात आला. यामध्ये अशा देशांची नावे समोर आली जिथे लोकांचं आयुष्यमान सर्वाधिक आहे. यामध्ये इटली, फ्रान्स, जपान या देशांचा समावेश आहे पण भारताचं नाव या यादीत कुठेच नाही. लोक दीर्घ काळ का जगू शकत नाहीत याचंही कारण समोर आलं आहे. एका अभ्यासात समोर आले आहे की लोकांचे आयुष्यमान कमी झाले आहे. मेडिकल टेक्नॉलॉजी अँड जेनेटिक रिसर्चमध्ये शंभर वर्षांपर्यंत जगणाऱ्या लोकांचा तर उल्लेखही केलेला नाही. म्हणजेच जीवनकाळात सुधारणा दिसत नाही. जास्त वर्षे जगणाऱ्या लोकांच्या देशातही आता आयुर्मानात घट होत असल्याचे या अभ्यासात दिसून आले आहे. संशोधकांचे असे म्हणणे आहे की आपल्याला कामातून कधी निवृत्त व्हायचं आहे याची जाणीव असली पाहिजे. चांगले जीवन जगण्यासाठी किती पैशांची गरज आहे याचीही माहिती असायला हवी.

इलिनॉईस शिकागो युनिव्हर्सिटीचे रिसर्चर एस.जे. ओलशानस्की यांनी सांगितले की हा स्टडी सोमवारी नेचर एजिंग पत्रिकेत प्रसिद्ध करण्यात आला. नव्या रिसर्च मध्ये 1990 ते 2019 पर्यंत जीवन प्रत्याशेच्या अनुमनाचे अध्ययन केले. जीवन प्रत्याशा म्हणजे एखाद्या वर्षात जन्मलेलं मुल किती वर्षे जगण्याची अपेक्षा असेल. परंतु हा अंदाज देखील पूर्ण नाही. हा एक स्नॅपशॉट अंदाज आहे. यातून एखादी महामारी, चमत्कारिक इलाज किंवा अनपेक्षित घटना यांमुळे होणाऱ्या मृत्यूंचा हिशोब देऊ शकत नाही. या अभ्यासात संशोधकांनी जिथे लोक दीर्घ काळ जगतात अशा जगातील आठ ठिकाणे निश्चित केली. यामध्ये ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, हाँगकाँग, इटली, जपान, दक्षिण कोरिया, स्पेन, स्वित्झर्लंड या देशांचा समावेश आहे. सर्वाधिक काळ जगणाऱ्या लोकांच्या देशांच्या यादीत अमेरिका पहिल्या 40 देशांच्या यादीतही नाही.

कर्जदारांचा EMI वाढणार नाही; आरबीआयकडून रेपो रेट पुन्हा जैसे थे

Country People Live The Longest दीर्घ काळ कोण जिवंत राहू शकतो

या रिसर्चमध्ये असे आढळून आले की पुरुषांच्या तुलनेत महिला जास्त काळ जगतात. मंद गतीने का होईना पण महिलांच्या जीवन प्रत्याशेत सुधारणा अजूनही होत आहे. 1990 मध्ये सुधारणेचे सरासरी प्रमाण अडीच वर्षे दर दशक अशी होती. 2010 च्या दशकाच्या काळात हे प्रमाण दीड वर्ष होते. अमेरिकेत हे प्रमाण शून्य होते. दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या जेरोन्टोलॉजी एक्स्पर्ट एलीन क्रिमिंसने एका ई मेलमध्ये म्हटले आहे की अभ्यासातून समोर आलेल्या मुद्यांशी मी सहमत आहे. याबातीत अमेरिकेची स्थिती अत्यंत काळजीत टाकणारी आहे. बहुतांश लोक किती काळ जिवंत राहू शकतील याची एक मर्यादा असते असे या रिसर्चमधून समोर आले आहे.

Country People Live The Longest लोकांचं आयुष्मान वाढणार..

एखादा व्यक्ती शंभर वर्षे जगणार असे आपण नेहमीच ऐकतो आणि त्यात काही विशेषही नाही. माजी अमेरिकी राष्ट्रपती जिमी कार्टर यांनी मागील आठवड्यात ही कामगिरी केली. ओल्शान्स्की यांनी सांगितले, 2019 मध्ये दोन टक्क्यांपेक्षा जास्त अमेरिकी नागरिक शंभर वर्षे जगले. जपानमध्ये हे प्रमाण 5 टक्के तर हाँगकाँगमध्ये 9 टक्के होते. शंभर वर्षांपर्यंत जगणाऱ्या लोकांच्या संख्येत आगामी काळात वाढ होईल असा अंदाज संशोधकांना वाटत आहे. याचं कारण लोकसंख्या वाढ आहे. ओल्शान्स्की यांनी सांगितलं की शंभर वर्षांपर्यंत पोहोचणाऱ्या लोकांची संख्या मर्यादीत असेल. बहुतांश देशांत 15 टक्क्यांपेक्षा कमी महिला आणि 5 टक्के पुरुष शंभर वर्षांपर्यंत जिवंत राहू शकतील.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img