15.1 C
New York

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे गटाला मोठ खिंडार; जालना जिल्ह्यातील बडा नेता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाणार

Published:

विधानसभा निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. (Hikmat Udan) सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता महाविकास आघाडी (Shivsena) आणि महायुतीमधील कोणत्या घटक पक्षांच्या वाट्याला किती जागा येणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, दुसरीकडे काही नेते ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर करताना देखील दिसत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा मोठा धक्का दिला आहे. जालना जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलं आहे. घनसावंगीतील ठाकरे गटाचे नेते हिकमत उढाण हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. येत्या दहा तारखेला ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेते प्रवेश करणार आहेत. हा विधानसभेच्या तोंडावर ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

नगरमधील भाजप नेता शरद पवारांच्या भेटीला पण….

डॉ. हिकमत उढाण यांनी मागील दहा वर्षापासून घनसावंगी या मतदारसंघावर लक्ष घालून आपली पकड मजबूत केली. येथे त्यांनी प्रशस्त संपर्क कार्यालय बांधलं, त्याचबरोबर जिल्हा परिषद, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती, ग्रामपंचायती यासह अन्य निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व टिकून ठेवले. मागील विधानसभा निवडणुकीत डॉ. हिकमत उढाण यांना एक लाखापेक्षा जास्त मते मिळाली. गेल्या निवडणुकीत ते राजेश टोपे यांच्याकडून अवघ्या 3 हजार 409 मतांनी पराभूत झाले होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img