बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणावत पुन्हा (Kangana Ranaut) अडचणीत सापडली आहे. वादग्रस्त वक्तव्यांनी तिने भाजपला अडचणीत आणले आहेच तर दुसरीकडे कोर्टाकडूनही तिला नोटीसा धाडल्या जात आहेत. ताज्या प्रकरणात कंगनाला जबलपूर जिल्हा न्यायालयाने नोटीस बजावली आहे. देशाच्या स्वातंत्र्यावर कंगनाने एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यासंदर्भातच न्यायालयाने नोटीस बजावली आहे. आता या वक्तव्यावर कंगना राणावतला स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे.
तक्रारदार अमित साहू यांनी म्हटले आहे की देशाच्या स्वातंत्र्याबाबत कंगनाने केलेल्या वक्तव्यामुळे देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान झाला आहेच शिवाय प्रत्येक भारतीयाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांचा अपमान करणारे वक्तव्य कंगनाने दिलं आहे. 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं यासाठी अनेकांनी बलिदान दिलं होतं.
Kangana Ranaut काय म्हणाली होती कंगना?
सन 2021 मध्ये कंगना म्हणाली होती की ‘भारताला मिळालेलं स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नव्हतं तर भीक होती. खरं स्वातंत्र्य तर 2014 मध्ये मिळालं.’ या वक्तव्यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. सोशल मीडियावर तर नेटकऱ्यांना कंगनाचा पद्मश्री पुरस्कार माघारी घेण्याचीही मागणी केली होती. अनेक राज्यांत कंगनाविरुद्ध खटले दाखल करण्यात आले होते. यानंतर आता कंगनाच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. या प्रकरणात न्यायालयाने तीन वर्षांनंतर कंगनाला नोटीस बजावली आहे. आता या नोटिसीचं समाधानकारक उत्तर कंगनाला द्यावचं लागणार आहे. या नोटिसीला भाजप खासदार कंगना राणावत काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने (Kangana Ranaut) तिच्या पहिल्या निवडणुकीतच विजय मिळवला होता. भाजपने अभिनेत्रीला हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीचं तिकीट दिलं होतं. या निवडणुकीत कंगना रनौतने काँग्रेस नेते विक्रमादित्य सिंह यांचा पराभव करत विजय नोंदवला. (Lok Sabha Election) मंडी मतदारसंघात कंगना यांच्या विरोधात काँग्रेसचे विक्रमादित्य सिंह उमेदवार होते. कंगना रनौत यांनी मंडी लोकसभा जागेवर जोरदार प्रचार केला आणि विजय मिळवला. खासदार झालयानंतरही कंगनाने वादग्रस्त वक्तव्य कमी केली नाहीत. त्याचा फटका तिला आणि भाजप दोघांनाही बसत आहे.