9.9 C
New York

Instagram : भारतात इंस्टाग्राम झालं डाऊन; लाखो वापरकर्त्यांची तक्रार

Published:

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामची सेवा (Instagram Down) संपूर्ण भारतात मंगळवारी अचानक डाऊन झाली. अनेक यूजर्संना लॉग इन करताना अडचणी आल्या. आउटेज ट्रॅकिंग सेवा देणाऱ्या डाउनडिटेक्टरच्या मते, असंख्य यूजर्संनी सकाळी ११:१५ च्या सुमारास इन्स्टाग्राम ॲपमध्ये लॉग इन करताना अडचणी येत असल्याच्या तक्रारी नोंदवण्यास सुरुवात केली. डाऊनडिटेक्टवरील आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, ६४ टक्के यूजर्संनी ॲपमध्ये लॉग इन करताना समस्या आल्याची नोंद केली आहे. २५ टक्के यूजर्संना सर्व्हर कनेक्शनशी संबंधित समस्या जाणवली.

अनेक वापरकर्त्यांनी आपल्या सोशल मीडिया खात्यांवर इंस्टाग्राम न चालण्याबाबतच्या तक्रारी व्यक्त केल्या आहेत. सध्या हा प्रॉब्लेम फक्त भारतात आहे की अन्य देशांमध्येही अशी परिस्थिती आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. इंस्टाग्रामकडून अजूनही या समस्येवर कोणतेही अधिकृत माहिती आलेली नाही. मात्र, तांत्रिक गडबडीमुळे ही समस्या निर्माण झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. Downdetector च्या डेटानुसार, हा आउटेज भारतातील अनेक प्रमुख शहरांमध्ये पाहिला जात आहे. जसजसा वेळ जात आहे तसतसे इंस्टाग्रामची सेवा कधी पूर्ववत होईल याकडे सर्वांचंलक्ष लागलेलं आहे.

Instagram मीम्स शेअर केले जात आहेत…

इंस्टाग्रामची सेवा बंद असल्याने निराश झालेले युजर्स इंस्टाग्रामबाबत एक्सवर मीम्स शेअर करत आहेत आणि इंस्टाग्रामची खिल्ली उडवत आहेत. X वरील एका वापरकर्त्याने प्रश्न केला की इंस्टाग्राम खरोखरच सर्व वापरकर्त्यांसाठी बंद आहे का? त्याने लिहिले, इंस्टाग्राम डाउन आहे, मला वाटले की मला एकट्यालाच इंटरनेटची समस्या आहे. दुसऱ्या युजरने लिहिले, इंस्टाग्रामची सेवा बंद आहे. इंस्टाग्रामशिवाय आयुष्य अधिक सुंदर आहे. इंस्टाग्रामची सेवा मंगळवारी अचानक डाउन झाली. यामुळे अनेकांना इंस्टाग्राम वापरताना अडचणी निर्माण झाल्या. अनेकांनी सांगितले की ते इंस्टाग्राम ओपन करू शकत नाहीत. अनेक वापरकर्त्यांनी X प्लॅटफॉर्मवर या आउटेजबद्दल माहिती दिली आणि स्क्रीनशॉट आणि मीम्स इत्यादी शेअर केले.

सुमारे 1 हजार वापरकर्त्यांनी Downdetector वर तक्रार नोंदवली आणि काही मिनिटांत ही संख्या 2 हजारांवर पोहोचली. यादरम्यान युजर्सनी सांगितले की, त्यांना इंस्टाग्राम चालवण्यात अडचणी येत आहेत. इंस्टाग्राम डाउन संदर्भात अनेक लोकांनी एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट देखील शेअर केल्या आहेत.

इंस्टाग्राम हे एक लोकप्रिय सोशल मिडीया प्लॅटफॉर्म आहे. अनेक यूजर्स यावर फोटो आणि व्हिडीओ इत्यादी शेअर करतात. या प्लॅटफॉर्मवर इंस्टाग्राम रील्स देखील खूप लोकप्रिय आहे. हे प्लॅटफॉर्म तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे, येथे वापरकर्ते मॅसेज देखील पाठवू शकतात. इंस्टाग्रामवर नेहमीच नवनवीन अपडेट येत असतात. ज्यामुळे तरूणांमध्ये इंस्टाग्रामची क्रेझ वाढत आहे. मात्र आज अचानक इंस्टाग्राम डाऊन झाले. युजर्सनना इंस्टाग्रामवर लॉग इन करताना समस्या येत होत्या. वेब वापरकर्त्यांना इंस्टाग्राम उघडताना “सॉरी, समथिंग वेंट राँग” असे लिहिलेले दिसत होते. त्यामुळे युजर्स हैराण झाले होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img