17 C
New York

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंकडून अमित शाहांची पोलखोल

Published:

गुजराती ठगाने गुजरात आणि देशामध्ये एक भिंत बांधली असल्याची टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलीयं. ठाकरे गटाकडून आज मुंबईतील दादरमध्ये राज्यव्यापी वज्र निर्धार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या निर्धार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी भाजपसह केंद्रीय मंत्री अमित शाहा (Amit Shah) यांच्यावर हल्लाबोल चढवलायं.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, लोकसभा निवडणुकीनंतर आत्ताचं सरकार दुर्देवाने केंद्रात सत्तेत बसलंय. सत्तेत बसलेले संविधान बदलणारच होते, निवडणूक काळात त्यांच्या मनातलं काळं बाहेर आलंच होतं. सत्ताधारी कितीही म्हणो, की हा फेक नरेटिव्ह पण हे सत्य आहे. शेवटी अनुभवासारखा दुसरा गुरु नाही. काश्मीर,हरयाणामध्ये जो निकाल लागलायं, तिथल्या जनतेलाही अनुभव आलायं. गुजराती आणि मराठी कधीच वाद नव्हता, हा वाद होऊ नये अशी आमची इच्छा आहे, पण एका गुजराथी ठगाने गुजरात आणि देशात एक भिंत बांधली असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

Uddhav Thackeray हिंदुत्वाचा बुरखा घालून संविधान बदलण्याचा प्रयत्न :

सत्ताधारी अयोध्येत का हरले, वाराणसीत का मागे गेले. तिकडे जाऊन विचारा तिथले खासदार माझ्याकडे येऊन गेले. सत्ताधाऱ्यांनी अयोध्येत राम मंदिर बांधलं, घाईगाईत बांधलं तरीही तिथला राम तुम्हाला पावला नाही कोणी तुमचा पराभव केला, जे कारसेवक तिथे शहीद झाले अपंगत्व आलं हे सगळं कोणासाठी केलं. आम्ही सगळ्या मुस्लिमांविरोधात नाही, जे देशद्रोही आहेत, त्यांच्याविरोधात आम्ही आहोत. देशासाठी बलिदान देणारा आमचा आहे. बोगस हिंदुत्वाचा बुरखा घालून हे लोकं देशाचं संविधान बदलू पाहत असल्याची खोचक टीकाही उद्धव ठाकरे यांनी केलीयं.

Uddhav Thackeray आता राजकारणात खांदा देण्याची वेळ…

भाजपला जेव्हा गरज होती तेव्हा त्यांना आम्ही खांद्यावर बसवून नेलं आहे. जेव्हा त्यांना गरज होती, तेव्हा तुम्ही आमचा खांदा वापरला आहे. तेव्हाही आम्ही तुम्हाला खांदा दिला होता, आता राजकारणातही तुम्हाला खांदा देणार आहोत, खांदा देण्याचे दोन अर्थ निघत असल्याची खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी केलीयं.

दरम्यान, संविधान बदलण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असल्याने लोकसभा निवडणुकीत मी जमलेल्या ‘माझ्या तमाम देशभक्त बांधवांनो’ अशी मी सुरवात केली, तर त्यांनी हिंदू बांधव अशी केली. देशभक्तामध्ये सर्वच जातीधर्माचे लोकं येतात, महाराष्ट्राचा धर्म राखण्यासाठी जो सोबत येईल तो आम्हाला हवा असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img