हवामान विभागाकडून आज सोमवारी (ता. ७) महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील भागात वादळी (Rain Update) वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. परतीच्या पावसाला देशात सुरूवात झाली असून, या पावसासाठी पोषक वातावरण सध्या राज्यात देखील तयार होत आहे. दिक्षिनेतील काही जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उर्वरित ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज देण्याता आला आहे.
भारतीय हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात बाप्पयुक्त वारे तयारी झाले आहेत. हळुहळू या वाऱ्यांची घुसळण होत असल्याने राज्यात ढगाळ वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. हा पाऊस शक्यतो सायंकाळी किंवा रात्री पडण्याचा अंदाज आहे. मुंबई ठाण्यासह महाराष्ट्राच्या दक्षिण भागात असलेल्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांत वादळी वारे आणि विजांसह जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसंच, या सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
बंगळुरू देशातील सर्वाधिक गर्दीचं शहर, दिल्ली-मुंबईचा नंबर कितवा?
पण, बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे राज्यात येत असल्यामुळं बुधवार अर्थात 9 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर यादरम्यान राज्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात सध्या होणारी वातावरणनिर्मिती पाहता हवेच्या वरच्या स्थरात उष्ण आणि कोरडे उष्ण वारे बाष्पयुक्त वाऱ्यांमध्ये मिसळल्यामुळं ढगांच्या गडगडाटासह पावसाची हजेरी असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये दुपारच्या वेळी तापमानातील दाहकता आणखी वाढणार असून, सायंकाळी मात्र काही भागांवर पावसाचा शिडकावा पाहायला मिळू शकतो. IMD च्या माहितीनुसार यंदाच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली होती. पण, त्या तुलनेत मात्र पावसाचं सरासरी प्रमाण कमी राहणार असल्याचंही आता आयएमडीकडून सांगितलं जात आहे.