आम्ही बापाशी, मुलाशी, तुमच्या गुंडांशी आणि पोलिसांशी भिडू. चिंता करु नका आताही भिडतो आहोत. तुमच्याकडे मोदी आणि शाहांची कवच कुंडले आहेत. ही कवच कुंडले आहेत, (Sanjay Raut ) म्हणून तुमचा आवाज आणि मस्ती सुरु आहे. ज्या दिवशी कवच कुंडले काढली जाईल तेव्हा तुम्ही भिडण्याची भाषा करणार नाही अशा शब्दांत शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट प्रहार केला.
उद्धव ठाकरेंनी त्यांच्या चिरंजीवाविषयी वक्तव्य केलं आहे. आपल्या वडिलांनी एकदा पण त्यांच्या चिरंजीवाचे प्रताप काय आहेत हे समजून घ्यावेत. मंत्रालयातल्या प्रशासनावर, ठेकेदारांवर ज्या पद्धतीची अरेरावी हे चिरंजीव करत आहेत. वर्षा बंगल्यातून अशा प्रकारची अरेरावी राज्याच्या इतिहासात कधी झाली नव्हती. त्यांचे चिरंजीव हे २० टक्के आहेत मुख्यमंत्री हे ४० टक्के असतील तर . पोलिसांना, अधिकाऱ्यांना धमकावण्याचं काम वर्षा बंगल्यातून त्यांचे चिरंजीव करत आहेत, असंही संजय राऊतांनी म्हटलं आहे.
‘महाराष्ट्राच सर्कस झालयं…’, राज ठाकरे यांनी शरद पवारांना खडे बोल सुनावले
डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला. शिंदेच्या गटाचे युवासेना नेते दीपेश म्हात्रेंनी मातोश्रीवर जात ठाकरे गटात प्रवेश केला. माजी नगरसेवक जयेश म्हात्रे, माजी नगरसेविका रत्ना म्हात्रे त्यांच्यासोबत त्यांचे बंधू आणि जवळपास पाच माजी नगरसेवकांनी मशाल हाती घेतली. खासदार श्रीकांत शिंदे यांचे दीपेश म्हात्रे हे निकटवर्तीय मानले जायचे.