15.1 C
New York

Eknath Shinde : बापाशी भिडा; CM शिंदेंचे उद्धव ठाकरेंना आव्हान

Published:

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे माजी स्थायी सभापती आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या युवा सेनेचे सचिव दिपेश म्हात्रे (Dipesh Mhatre) यांनी आज आपल्या सहकाऱ्यांसह मातोश्रीवर ठाकरे गटात प्रवेश केला. या सर्वांचे उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले. शिंदे पिता-पुत्रांवर यावेळी उद्धव ठाकरेंनी टीका करत खासदार श्रीकांत शिंदेंचा (Shrikanth Shinde) उल्लेख कारटं असा केला. सीएम एकनाथ शिंदेंनी त्या टीकेला आता जोरदार प्रत्युत्तर दिलं.

मुलाशी काय भिडता? बापाशी भिडा, एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचे नाव न असे आव्हान केलं. एकनाथ शिंदे छत्रपती संभाजी नगरमध्ये बोलताना म्हणाले, आम्ही उत्तर उद्धव ठाकरेंच्या आरोपांना देणार नाही. आम्ही उत्तर कामातूनच देत आलो आणि कामातूनच आताही देऊ. ते त्यांच्या पायाखालची जमीन सरकल्यामुळे बिथरले आहेत, त्यांना धडकी लाडकी बहीण योजनेमुळे भरलीये, अशी परिस्थिती त्यांची झालेली आहे, असं शिंदे म्हणाले. पुढं बोलतांना ते म्हणाले, लेकराशी काय भिडता, बापाशी भिडा ना, असं आव्हान मुख्यमंत्री शिंदेंनी दिलं.

हर्षवर्धन पाटलांनी अखेर तुतारी फुंकली

Eknath Shinde उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

उद्धव ठाकरे दिपेश म्हात्रे यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर म्हणाले होते की, आता त्या ठिकाणी जे खासदार आहे, मुख्यमंत्र्यांचं कार्ट. लोकसभेच्या निवडणुकीत कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघात पैसा ओताला. सत्तेचा गैरवापर करण्यात आला. शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याच्या विरोधात प्रचार करण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांना तिथं यावं लागलं. मात्र, तरी देखील कल्याण-डोंबिवलीकरांनी सुमारे चार लाख मते आपल्या भगव्याला दिली. आता तुमची सर्वांची ताकद विधानसभा निवडणुकीत दाखवून द्या, असं उद्धव ठाकरे म्हणाले.दरम्यान, उद्धव ठाकरेंनी शिंदे म्हात्रे यांना पक्षात प्रवेश देऊ शिंदे सेनेला मोठा धक्का दिला. मातोश्रीवर झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्याला आमदार आदित्य ठाकरे, विनायक राऊत, वरुण सरदेसाई, कल्याण संपर्क प्रमुख गुरुनाथ खोत, माजी आमदार सुभाष भोईर आदी नेते उपस्थिती होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img