12.5 C
New York

BJP : PM मोदींचं मंदिर बांधणाऱ्या कार्यकर्त्याची भाजपला सोडचिठ्ठी

Published:

सध्या निवडणुकांचा काळ आहे. सगळीकडे फक्त निवडणुकीच्याच चर्चा आहेत. (BJP) राजकीय पक्ष नेतेमंडळी, मंत्री, पदाधिकारी आणि कार्यकर्ते झाडून सगळे कामाला लागले आहेत. काहीही करून निवडणूक जिंकायचीच असा त्यांचा प्रयत्न आहे. दुसरीकडे सर्वसामान्य जनता आहे. त्यांनाही आपला नेता पुन्हा विजयी व्हावा असे वाटणे सहाजिक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता तर जबरदस्त आहे. यासाठी लोकं आपापल्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रात असाच एक भाजपाचा जबरा कार्यकर्ता आहे. मयूर मुंडे असं त्याचं नाव. या बहाद्दरानं पंतप्रधान मोदींचं मंदिरच (PM Narendra Modi) बांधलं आहे. आता याच मुंडेंबद्दल मोठी बातमी समोर आली आहे.

मयूर मुंडे यांनी (Mayur Munde) भाजपालाच सोडचिठ्ठी दिली आहे. आता तुम्ही म्हणाल मोदींचं मंदिर बांधणारा कार्यकर्ता कसा काय पक्ष सोडू शकतो. पण हे खरं मयूर मुंडे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. मयूर मुंडे यांनी सन 2021 मध्ये पीएम मोदींचं मंदिर बांधलं होतं. त्यावेळी याची खूप चर्चाही झाली होती. परंतु, आता याच कार्यकर्त्याने पक्ष सोडला आहे. असं नेमकं काय घडलं की ज्यामुळे मयूर मुंडेंना पक्ष सोडावा लागला याचा खुलासा त्यांनीच केला आहे.

राज्यात विधानसभा निवडणुका (Maharashtra Elections) तोंडावर आल्या आहेत. त्याचवेळी भाजप पुणे शाखेत काही मतभेद समोर आले आहेत. कोथरूड आणि खडकवासलातील विद्यमान आमदार आगामी निवडणुकीसाठी उमेदवार निवडीत हस्तक्षेप करण्याचा आरोप केला जात आहे. पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघाच्या विद्यमान आमदारांकडून कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचे सांगितले जात आहे. याच मुद्द्यावर नमो फाउंडेशनचे मयूर मुंडे यांनी शिरोळे यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

मुंडे म्हणाले, मी पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. विविध पदांची जबाबदारी पार पाडली आहे. प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलं आहे. पण आता पक्षाकडून या कार्यकर्त्यांकडं दुर्लक्ष होत आहे. दुसऱ्या पक्षातून येणाऱ्या नेत्यांना जास्त महत्व दिलं जात आहे. आमदार स्वतःचा जनाधार वाढविण्याच्या प्रयत्नात गुंतले आहेत. यासाठी पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जात आहे.

काँग्रेसचे आमदार अचानक शरद पवारांच्या भेटीला, नेमकं करण काय?

दुसऱ्या पक्षातून आलेल्या नेत्यांना विभिन्न पदे दिली जात आहेत. पक्षातील जुन्या पदाधिकाऱ्यांचा अपमान होत आहे. पक्षाच्या बैठकांसाठीही त्यांना बोलावलं जात नाही. त्यांचं म्हणणं देखील ऐकून घेतलं जात नाही. निवडणूक प्रक्रियेपासूनही दूर करण्यात आलं आहे, अशी खंत मुंडे यांनी व्यक्त केली.

भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर मुंडे म्हणाले, विद्यमान आमदार दुसऱ्या पक्षातून आलेल्या लोकांच्या परिसरात विकासकामांसाठी निधी खर्च करत आहेत. पण जे पक्षाचे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत त्यांच्यासाठी काहीच केलं जात नाही. मी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मी पीएम मोदींचा कट्टर समर्थक आहे आणि त्यांच्यासाठीच काम करत राहिल. पण आता पक्षात आमच्यासारख्या लोकांसाठी जागा राहिलेली नाही. त्यामुळे मी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला आहे, असे मयूर मुंडे म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img