बिग बॉस मराठी सीझन 5च्या (Bigg Boss Marathi) विनर ट्रॉफीवर सूरजने (Suraj Chavan) आपलं नाव कोरलं आहे. पहिल्या आठवड्यापासूनच घरातील त्याचं वागणं, बोलणं या सगळ्याचच घरातील आणि घराबाहेरही चर्चा होत होती. अगदी शांतपणे सूरज त्याचा खेळ साऱ्यांच्याच पसंतीस पडला. त्यामुळे बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनच्या ट्रॉफीवर सूरजने नावं कोरलं आहे.
‘बिग बॉस मराठी सीजन 5’चा फिनाले झालाय. टॉप 2 फायनलिस्टपर्यंत अभिजीत सावंत आणि सूरज चव्हाण हे दोघे पोहोचले. निकी तांबोळी ही बिग बॉसच्या टॉप 3 मधून बाहेर पडली. आता बिग बॉस मराठी सीजन 5 ला त्याचा विजेता मिळालाय. सूरज चव्हाण हा ज्यावेळी बिग बॉसच्या घरात दाखल झाला. त्यावेळी अनेकांनी भूवया उंचावल्या. सूरज चव्हाण अत्यंत साधा दिसतो. अस्सल ग्रामीण भागातून सूरज आला. सूरजच्या घरची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. तो लहान असतानाच त्याच्या आई वडिलांनी जगाचा निरोप घेतला. त्याच्याकडे राहण्यासाठी साधे घर देखील नाहीये. सूरजवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम केल्याचे बघायला मिळाले. भरपूर मत लोकांनी त्याला दिली.
बंगळुरू देशातील सर्वाधिक गर्दीचं शहर, दिल्ली-मुंबईचा नंबर कितवा?
सूरज चव्हाण याचे शिक्षणही अत्यंत कमी झाले असून त्याला मराठी देखील वाचता येत नाही. सूरज चव्हाणची तरूणाईमध्ये एक वेगळीच क्रेझ ही बघायला मिळते. सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडीओ तयार करत ग्रामीण भागातील मुले सूरज याला मत देण्यासाठी विनंती करत होते आणि आता सूरज चव्हाण हाच बिग बॉसचा विजेता ठरलाय.
सूरज चव्हाण याला बिग बॉसकडून 14 लाख रूपयांचे बक्षिस सूरज चव्हाण याला मिळाले. सूरज चव्हाण विजेता ठरला तर उपविजेता अभिजीत सावंत हा ठरलाय. दोघेही बिग बॉसच्या घरात धमाकेदार गेम खेळताना दिसले. सूरज चव्हाणला प्रेक्षकांनी धमाकेदार पद्धतीने प्रेम दिल्याचे बघायला मिळतंय. बिग बॉसच्या घरात सूरज टास्क देखील चांगले खेळताना दिसला.