विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर (Maharashtra Elections) राज्यात तिसऱ्या आघाडीची घोषणा झाली आहे. या आघाडीसाठी आमदार बच्चू कडू यांनी (Bachchu Kadu) पुढाकार घेतला होता. या तिसऱ्या आघाडीवर महाविकास आघाडीचा विश्वास नाही तर दुसरीकडे महायुतीने आपले डाव टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सुरुवातीलाच आघाडीच्या वाटेत अडथळे निर्माण झाले आहेत. आमदार बच्चू कडू यांचे अत्यंत विश्वासू सहकारी शिवसेनेकडून उमेदवार उभा ठाकण्याची शक्यता आहे. शिंदे गटाची ही खेळी बच्चू कडूंच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. शिंदेंनी एक खेळी खेळली तर आम्ही दहा खेळी खेळू अशा शब्दांत कडू यांनी इशारा दिला आहे.
बच्चू कडू पुढे म्हणाले, राजकुमार पटेल यांनी प्रहार सोडणं ही भाजप शिवसेनेची खेळी आहे. आणखी दोन ते तीन कार्यकर्ते सोडून जाण्याच्या तयारीत आहेत. आम्हाला लढण्याची सवयच आहे. पुन्हा लढू आणि निवडून येऊ त्याने काही फरक पडत नाही. प्रत्येकाचा राजकिय स्वार्थ असतो त्यामुळे ते जात असतील तर त्याची आम्हाला पर्वा नाही. आहे त्यांनी सुखात राहावं. एकनाथ शिंदेंनी आम्हाला एक घाव केला त्याच्या बदल्यात हजारो घाव आम्ही देऊ.
काँग्रेसचे आमदार अचानक शरद पवारांच्या भेटीला, नेमकं करण काय?
शिंदे गटाला सुद्धा याचे परिणाम भोगायला लावू. त्यांनी एक खेळी खेळली आम्ही दहा खेळी खेळू त्याचे परिणाम शिंदे गटाला भोगायला लावू अशी भूमिका आम्ही घेऊ. आम्ही सुद्धा मैत्री कायम ठेवून राजकुमार पटेल यांच्या विरोधात उमेदवार देऊ. आमचे काही पदाधिकारी व आम्हाला आणखी सोडून जातील काही लोक राजकीय हेतूने काही आर्थिक हेतूने सोडून जातील. एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde) आम्हाला दिव्यांग मंत्रालय दिलं त्याचं ऋण आमच्यात कायम आहे. पण त्यांनी खेळलेली खेळी त्यांनाच घातक ठरणार आहे, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला.