12.2 C
New York

Traffic Quality Index : बंगळुरू देशातील सर्वाधिक गर्दीचं शहर, दिल्ली-मुंबईचा नंबर कितवा?

Published:

भारताच्या अनेक मोठ्या शहरांची लोकसंख्या कोटींच्या घरात आहे. ट्रॅफिक क्वालिटी इंडेक्सकडून (Traffic Quality Index) बंगळुरू शहराला सर्वाधिक गर्दीचा शहर म्हणून मान्यता मिळाली आहे. ट्रॅफिक गुणवत्ता निर्देशांक वाहतुकीच्या परिस्थिबाबत अचूक अहवाल देतो. यामध्ये बंगळुरू शहर (Bengaluru) सर्वाधिक गर्दीच शहर म्हणून नमूद करण्यात आले आहे. या शहराचा स्कोर ८०० ते १००० च्या दरम्यान आहे.

Traffic Quality Index बंगळुरू नंतर ‘या’ शहराचा नंबर

अहवालानुसार मुंबई ७८७ स्कोअरसह दुसऱ्या क्रमांकाचे गर्दीचे शहर ठरले आहे. यानंतर दिल्ली आणि हैद्राबाद ७४७ आणि ७१८ स्कोअरसह मुंबई नंतरची शहरे आहेत. रिपोर्ट नुसार बंगळूरूतील सर्वात गर्दीचं ठिकाण असणाऱ्या सिल्क बोर्ड जंक्शन परिसरात डबल डेकर उड्डाणपूल सुरू झाला आहे. यानंतर येथील वाहतुकीची समस्या काही प्रमाणात कमी झाली आहे. पोलिस आयुक्त कुलदीप कुमार जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार सिल्क बोर्डवर ट्रॅफिक जामची समस्या जवळपास ५० टक्क्यांनी कमी झाली आहे.

काँग्रेसचे आमदार अचानक शरद पवारांच्या भेटीला, नेमकं करण काय?

उड्डाणपूल होण्याआधी येथे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले जात होते. आता या भागात उड्डाणपूल तयार झाला आहे. त्यामुळे वाहतुकीची समस्या कमी झाली आहे. दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. त्यामुळे रस्ते, उड्डाणपूल यांसारख्या मूलभूत सुविधा कमी पडू लागल्या आहेत. येथील जंक्शन वर आधी १९ किलोमीटर दूरवरून वाहनांच्या रांगा लागत होत्या. आता हे प्रमाण १० किलोमीटरवर आले आहे. वाहतूक कोंडीची समस्या पूर्ण कमी झालेली नाही. मात्र यामध्ये काही प्रमाणात कमी आली आहे असे म्हणता येईल.

Traffic Quality Index जगातील दुसरं सर्वाधिक गर्दीचं शहर

बंगळुरू फक्त देशातच नाही तर जगातील सर्वाधिक गर्दीच्या शहरांत टॉपवर आहे. 2023 मधील एका अहवालात लंडननंतर बंगळुरू दुसऱ्या क्रमांकाचं शहर असल्याचं नमूद करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात शहरातील रस्ते पाण्याखाली असतात. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. ही वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये आता एआय टेक्नॉलॉजीचाही वापर करण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील वाहतुकीची समस्या कमी होण्यात मदत मिळत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img