रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज (शनिवारी) रात्री फलटण येथील खटके वस्तीत कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावला आहे. (Ajit Pawar) या मेळाव्यात ते कार्यकर्त्यांशी चर्चा करुन निर्णय जाहीर करणार आहेत. रामराजे यांच्यासोबत विद्यमान आमदार दीपक चव्हाण हे देखील अजित पवार यांची साथ सोडणार असल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी सोळशी येथील एका कार्यक्रमात अजित पवार यांनी फोनवरुन दीपक चव्हाण यांची उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतरही दीपक चव्हाण हे अजित पवार यांची साथ सोडणार.
भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्यातून विस्तवही जात नाही. लोकसभा निवडणुकीतही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यास रामराजेंचा विरोध होता. पण त्यानंतरही त्यांनाच उमेदवारी दिल्याने रामराजे नाराज झाले होते. रामराजे नाईक निंबाळकर यांनी काही दिवसांपूर्वी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याबाबत अजित पवार यांच्याकडे तक्रारही केली होती.
एका बैठकीत कार्यकर्त्यांशी बोलताना रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले होते, रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि त्यांचे कार्यकर्ते दहशत निर्माण करत आहेत. त्यांच्या दहशतीला पाठिंबा देऊ नये, हीच आपली अपेक्षा आहे. याबाबत सांगून पाहू. फरक पडला तर ठीक, अन्यथा तुतारी वाजवण्यास फार वेळ लागणार नाही, असे रामराजे म्हणाले होते. त्यानंतर आज त्यांच्या शरद पवार गटातील संभाव्य प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. खरंतर शरद पवार आणि रामराजे यांची गुप्त भेट झाल्याची चर्चा होत आहे. त्यामुळे रामराजे लवकरच आपला निर्णय जाहीर करतील अशी शक्यता व्यक्त होत आहे.
पवारांच्या इशाऱ्यानंतर अजितदादांचा मूड बदलला?
Ajit Pawar तिकीट कन्फर्म असणारा उमेदवारही धक्का देणार
विशेष म्हणजे, अजित पवार यांनी फलटणचे विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांची उमेदवारी जाहीर केली होती. मात्र आता दीपक चव्हाणही अजितदादांची साथ सोडण्याची तयारी करत असल्याची चर्चा आहे. जर त्यांनी खरंच असा निर्णय घेतला तर अजित पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का ठरणार आहे. दीपक चव्हाण यांनी मात्र असं काहीच नसल्याचं स्पष्ट केलं. आपण सध्या तरी अजित पवार यांच्याबरोबरच आहोत अशी प्रतिक्रिया दीपक चव्हाण यांनी दिली.
Ajit Pawar अजित पवार काय म्हणाले होते ?
दीपक चव्हाण यांची उमेदवारी जाहीर करताना अजित पवार म्हणाले होते की दीपक चव्हाण आपले उमेदवार आहेत. आता विधानसभा निवडणुकीत आपण घड्याळ चिन्हावर निवडणुका लढणार आहोत. त्यामुळे आता चव्हाणांना सहकार्य करा. नंतर जो काही निधी लागणार आहे त्याबाबत माझ्यावर विश्वास ठेवा असे अजित पवार म्हणाले होते.