11 C
New York

Rahul Gandhi : अदानी-अंबानींचं नाव घेत राहुल गांधी बरसले

Published:

मी शाळेत दलित आणि मागासांचा इतिहास वाचला नाही असे म्हणत राहुल गांधींनी (Rahul Gandhi) त्यांच्या मनातली खंत व्यक्त केली आहे. शाळेत असताना मला दलित अस्पृश्यतेच्या बाबत काहीच मिळालं नाही. फक्त तीन चार लाईनच शाळेत शिकवल्या. मात्र, आज उलटं होत आहे. जो काही इतिहास आहे तो मिटवला जात असल्याचे म्हणत राहुल गांधींनी जोरदार हल्लाबोल केला आहे. ते कोल्हापूरमध्ये बोलत होते.

Rahul Gandhi अदानी-अंबानींच्या कर्मचाऱ्यांची यादी काढा

पुढे बोलताना राहुल गांधींनी अदानी आणि अंबानींवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, देशातील टॉप अडीशचे कंपन्यांची यादी काढा त्यात वरिष्ठ पदावर एकही दलित किंवा ओबीसी दिसणार नाही. अदानी, अंबानींच्या कंपनीचे मॅनजर्स पाहा असे म्हणत त्यात सीनिअर मॅनेजर्स दलित आहे का? असा प्रश्न राहुल गांधींनी विचारला. आज जे कुणी कर्मचारी अदानी आणि अंबानींच्या कंपनीत काम करत आहेत ज्यांचा पगार एक कोटी, 50 लाख असतो. त्यात मला एक दलित, आदिवासी आणि मागास व्यक्ती दाखवा असे ते म्हणाले. मीडियातील मालकांची नावे काढा, ज्युडिशिअरी पाहा, इंटेलिजन्स एजन्सी पाहा या कोणत्याच ठिकाणी तुम्हाला कुठेच दलित किंवा ओबीसी व्यक्ती दिसणार नाहीत.

कोल्हापुरातील वारं राहुल गांधींनी फिरवलं; टेम्पो चालकाच्या घरी स्वतः झाले ‘कुक’

Rahul Gandhi ज्यांच्या हातात कला त्यांनाच मागे टाकलं जात आहे

यावेळी राहुल गांधींनी ज्यांच्या हाती कला आहे. त्यांनाच मागे टाकण्याचं काम सुरू असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, ज्यावेळी मी मंचावर स्वप्नील कुंभार नावाच्या व्यक्तीबरोबर हस्तांदोलन केले त्यावेळी मला असं जाणवलं की या हातात कला आहे. त्यावेळी स्वप्नील कुठे आहे असे विचारले त्यावेळी त्यांना मागे बसवण्यात आल्याचे सांगण्यात आले. हाच मुद्दा अधोरेखित करत आज ज्यांच्या हातात कला आहे, त्यांनाच मागे बसवण्याचं काम सुरू असून, हे संपूर्ण भारतात चोवीस तास होत असल्याचे राहुल गांधी म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img