महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका अगदी (Maharashtra Elections) जवळ आलेल्या असताना एक मोठी (NIA-ATS Joint Operation) बातमी समोर आली आहे. आज सकाळीच NIA-ATS ने संयुक्त मोहिम राबवत देशविघातक कृत्य करण्याच्या तयारीत असणाऱ्या काही जणांना उचललं. या कारवाईने राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मालेगाव, जालना आणि औरंगाबाद येथून काही तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
यानंतर या युवकांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरा आझाद चौकाजवळच्या भागात मोठी कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. आज पहाटेच एटीएस आणि एनआयएने छापेमारी सुरू केली. छुप्या पद्धतीने देशविघातक कृत्यात सहभागी असल्याचा संशय तरुणांवर आहे. याचबरोबर जालन्यातही अशीच कारवाई करण्यात आली. येथून एका जणाला ताब्यात घेण्यात आलं. छत्रपती संभाजीनगरमधील आझाद चौकाजवळून एक तर एन सिक्स परिसरातून एका जणाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे.
अजितदादांना धक्का बसणार! आणखी एक आमदार तुतारी फुंकणार
देशातच अशा पद्धतीची मोहिम राबवण्यात येत आहे. एकाच वेळी अनेक ठिकाणी छापेमारी करून अशा देश विघातक कृत्य करण्याच्या तयारीत असणाऱ्या लोकांना ताब्यात घेतलं जात आहे. देशभरात जी कारवाई सुरू आहे या कारवाईत कुणाला ताब्यात घेण्यात आलं. त्यामागे काय कारण आहेत याचा खुलासा अद्याप झालेला नाही. महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांतून तिघा जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या तरुणांना नेमकं कोणत्या कारणामुळे ताब्यात घेण्यात आलं. त्यांनी काय केलं आहे याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. परंतु, या कारवाईने राज्यात खळबळ उडाली आहे. या तरुणांकडे चौकशी करण्यात येत आहे. या चौकशीतून कोणती माहिती समोर येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सध्या ज्या ठिकाणी छापेमारी करण्यात आली तेथे पंचनामे करण्याचे काम सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. दरम्यान, महाराष्ट्रात एनआयएने याआधीही अशी कारवाई केली आहे. ताज्या छापेमारीने राज्यभरात खळबळ उडवून दिली आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई झाल्याने या कारवाईची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.