राज्यात नवीन आघाडी माजी खासदार संभाजी राजे, राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांनी स्थापन केली आहे. राज्यातील महाविकास आघाडीला या आघाडीचा अधिक फटका बसणार असल्याचं सांगितलं जात आहे. लढवण्याची जोरदार तयारी सुरू या आघाडीने केली आहे. त्यामुळे या आघाडीच्या कामगिरीकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. असं असतानाच माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी या आघाडीवर खोचक आणि मिश्किल टिप्पणी केली आहे.
माजी मंत्री शरद पवार हे आज सांगलीत होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. राज्यात नवीन आघाडी तयार झाली आहे. त्याचा तुम्हाला फटका बसणार आहे का? असा सवाल करण्यात आला. त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. केव्हाही हे लोक एकत्र आल्यावर परिणाम होणारच. संभाजीराजे हे महान घराण्यातील लोकं आहेत. त्यामुळे नक्कीच परिणाम होईल. आमची झोप उडाली आहे. आम्ही भयंकर अस्वस्थ आहोत. आता काय आपलं होणार?, असा खोचक टोला शरद पवार यांनी लगावला आहे.
शरद पवारांनी मराठा आरक्षणाबाबत केलं मोठं वक्तव्य
Sharad Pawar शाह चांगलं मार्गदर्शन करत आहेत
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही शरद पवार यांनी यावेळी जोरदार टीका केली. ते बरंच काही बोलतात. हल्ली त्यांचा महाराष्ट्रात मुक्काम वाढला आहे. त्यांना महाराष्ट्र आवडतो असं ऐकलं. त्यांचं कोल्हापूरचं कनेक्शन आहे. सासूरवाडी आहे…? मग साहजिकच आहे. ते येतात. भाषणं करतात. देशाचा गृहमंत्री भाषण काय करतो? शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर लक्ष ठेवा. विरोधी पक्ष फोडा. कायदा सुव्यवस्था यांच्या हातात आहे. ते चांगलं मार्गदर्शन करत आहेत. याचा निकाल राज्यातील दीड महिन्यात घेतील, असा टोला त्यांनी लगावला.
Sharad Pawar मोदींनी अधिक सभा घ्याव्यात
मागच्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या. पंतप्रधान मोदींनी 18 ठिकाणी सभा घेतल्या, कुणी तरी सांगत होतं . 14 ठिकाणी त्यांचा पराभव झाला. 18 ठिकाणी सभा घेऊन 14 ठिकाणी पराभव होत असेल तर विधानसभा निवडणुकीवेळी महाराष्ट्रात अधिक या, ही विनंती आहे. शरद पवार यांनी इथे आणखी सभा घ्या, असा चिमटा काढला.