14.3 C
New York

Harshavardhan Patil : देवेंद्र फडणवीसांनी कोणता प्रस्ताव दिला? तुतारी हाती घेताच पाटील म्हणाले

Published:

भाजपला विधानसभेच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे. इंदापूर तालुक्यातील भाजपचे मोठे नेते हर्षवर्धन पाटील यांनी (Harshavardhan Patil) अखेर भाजपला रामराम करत तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांच्या (Sharad Pawar NCP) राष्ट्रवादी शरद पवार या पक्षात प्रवेश जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आज इंदापूर येथे जाहीर कार्यक्रमात आपण या पक्षात जायचं की नाही अशी चर्चा कार्यकर्त्यांशी करून त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत या निर्णयाची घोषणा केली. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर हर्षवर्धन पाटलांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

हर्षवर्धन पाटील म्हणाले, कार्यकर्त्यांचा प्रचंड आग्रह होता. आम्ही सुद्धा मतदारसंघात दौरे करत होतो. निवडणुकीच्या संदर्भात काय निर्णय घ्यायचा यासाठी मी चार दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसांना भेटलो. दीड ते दोन तास चर्चा झाली. त्यांनी काही प्रस्ताव ठेवले. मी देखील माझी भूमिका मांडली. नंतर त्यांनी सांगितलं ही जागा महायुतीतील विद्यमान आमदार लढणार आहेत. त्यांनी दुसरा दुसरा पर्याय माझ्यासमोर ठेवला. हा पर्याय स्वीकारणं माझ्यासाठी वैयक्तिकपणे संयुक्तिक ठरलं असतं. पण खरा प्रश्न जनतेचा असतो. त्यामुळे हा प्रस्ताव स्वीकारणं मला संयुक्तिक वाटलं नाही.

त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर मला शरद पवारांचा निरोप आला. सिल्व्हर ओकवर भेटायला या सांगितलं गेलं. त्यानंतर काल शरद पवार साहेबांबरोबर दीड तास चर्चा झाली. यावेळी सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. जयंत पाटलांशी फोनवर बोलणं झालं. तुम्ही आमच्या पक्षात या असा आग्रह दोघांनीही केला. मी इंदापुरला आल्यावर कार्यकर्त्यांना विचारलं काय करायचं?

अखेर हर्षवर्धन पाटलांचा भाजपला राम-राम, तुतारी फुंकली

त्यांनीही शरद पवार गटात जाण्याचा आग्रह धरला. त्यामुळे आज मी घोषणा करतो की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे. हा माझ्या एकट्याचा निर्णय नाही. यासंदर्भात मी भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांशी बोललो असून त्यांना माझ्या निर्णयाची कल्पनाही दिली होती. तालुक्यात जी माणसं आमच्यामागे होती त्यांना खूप त्रास झाला. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

Harshavardhan Patil पत्रकारांच्या प्रश्नांवर पाटलांचे नो कमेन्ट्स

देवेंद्र फडणवीसांबरोबर झालेल्या चर्चेत त्यांनी तुम्हाला कोणता प्रस्ताव दिला होता असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर मात्र हर्षवर्धन पाटील यांनी उत्तर देणे. याबाबतीत चर्चा झाली आहे. त्यावर आता काही बोलता येणार नाही असे हर्षवर्धन पाटील म्हणाले. ज्या पवार कुटुंबाविरोधात राजकारण केलं. आता त्यांच्याच एक गटात तुम्ही प्रवेश करत आहात असे विचारले असता पाटील म्हणाले, राजकारणात कुणी कुणाचा शत्रू नसतो. आमचे व्यक्तिगत संबंध आहेत. ते टिकवावे लागतात. ही राज्याची संस्कृती. ती जपण्याचं काम करतोय.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img