14.8 C
New York

LIVE Update : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी पाहा एका क्लिकवर पाहा

Published:

 आदिवासी आमदार आज मंत्रालयात दाखल, अजित पवारांना भेटणार

आदिवासी आमदार आज मंत्रालयात दाखल झाले असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी ते महत्वपूर्ण चर्चा करण्यासाठी भेटणार आहेत. या भेटीत आदिवासी समाजाच्या विविध मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे, ज्यात त्यांचे हक्क, विकास योजना, तसेच शासकीय धोरणे यांचा समावेश असेल.

आजच्या कॅबिनेट बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे

आजच्या कॅबिनेटच्या अजेंड्यात विविध महत्त्वाचे मुद्दे समोर आले आहेत. मागील बैठकीच्या इतीवृत्तांताला मान्यता देणे हा पहिला विषय होता. राज्यातील पाऊस आणि पीक पाण्याच्या स्थितीवर चर्चा झाली. ‘लाडकी बहीण’ योजनेचा विभागवार आढावा घेण्यात आला. ॉ

पुणे आणि कोकणात कायमस्वरूपी नवी SDRF टीम तैनात करण्याचा प्रस्ताव देखील चर्चेत आला. धरणांवरील जलविद्युत प्रकल्प BOT तत्त्वावर देण्याबाबतही निर्णय घेण्यात आला. याशिवाय आयत्यावेळी येणाऱ्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

तिरुपती लाडू प्रकरणी मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाची FSSAI ला नोटीस

मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने FSSAI ला पुरवणी नोटीस जारी करण्याचे निर्देश दिले आहेत आणि तिरुपती लाडू बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपाच्या पुरवठ्याशी संबंधित प्रकरणात एआर डेअरी फूडला उत्तर देण्यासाठी वेळ द्यावा.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज निपाणी दौऱ्यावर

केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी आज (ता. ४) निपाणी दौऱ्यावर येत आहेत. केएलईचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांचा नागरी सत्कार व व्हीएसएम सोमशेखर कोठीवाले एमबीए, एमसीए इमारत उद्‌घाटन या कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत. गडकरी सकाळी ८.३० वाजता नवी दिल्ली येथून विमानाने कोल्हापूरच्या दिशेने प्रयाण करतील. सकाळी १०.३० वाजता उजळाईवाडी विमानतळावर आगमन होईल.

सुप्रीम कोर्टात आज तिरुपती लाडू प्रकरणाचा फैसला

 सर्वोच्च न्यायालय आज तिरुपती लाडूमधील प्राण्यांच्या चरबीच्या कथित भेसळीच्या प्रकरणासह न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी करणाऱ्या अनेक याचिकांवर सुनावणी करणार आहे. तुषार मेहता यांनी या प्रकरणी सुनावणीची विनंती न्यायालयाला केली होती. न्यायमूर्ती बीआर गवई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने ही विनंती मान्य केली आणि आज सकाळी प्रथम सुनावणी घेण्यास सांगितले.

सर्वपक्षीय आदिवासी आमदार आज मुख्यमंत्र्यांना पुन्हा भेटणार

सर्वपक्षीय आदिवासी आमदार मुख्यमंत्र्यांना आज पुन्हा भेटणार असल्याची माहिती मिळत आहे. बुधवारी आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी वेळ मागितली होती. पेसा भरती आणि धनगरांना आदिवासीतून आरक्षण नको, ही प्रामुख्याने त्यांची मागणी आहे.

मिर्झापुरात मोठी दुर्घटना; ट्रॅक्टर-ट्रकच्या धडकेत 10 जण ठार, तिघे जखमी

 उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे गुरुवारी रात्री उशिरा एक मोठी दुर्घटना घडली. भदोही जिल्ह्यातून 13 जणांना घेऊन बनारसला जात असलेल्या ट्रॅक्टरला एका अनियंत्रित ट्रकने मागून जोराची धडक दिली. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरु केले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img