-0.1 C
New York

Crime News : मोटारसायकली चोरी करणाऱ्या दोघांना अटक;  स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Published:

ओतूर, प्रतिनिधी: दि.४ ऑक्टोबर रमेश तांबे

जुन्नर, आंबेगाव तालुक्यामध्ये मोटारसायकल चोरी करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक करुन आरोपीकडून एकूण ३ लाख ५९ हजार रूपये किमतीच्या एकूण ६ मोटरसायकल केल्या जप्त करण्यात आल्या असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिली.

रवींद्र नारायण गांगड वय १८ वर्ष, कैलास हारकु मधे वय १९ दोघेही राहणार वाघवडी ता.पारनेर जि.अहमदनगर अशी दोघा आरोपींची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिळीमकर म्हणाले की,स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जुन्नर उपविभागात मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत असताना, या पथकाला गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की रवी गांगड आणि कैलास मधे हे नारायणगाव मांजरवाडी येथे विना नंबर प्लेट च्या मोटारसायकलवर फिरत आहेत. सदर ठिकानी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले.

मला संपवू नका, तुम्ही..; अशोक चव्हाण असं का म्हणाले?

यातील आरोपी रवींद्र गांगड व कैलास मधे यांना पोलिसी खाक्या दाखवून, त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता,सदर मोटरसायकल चोरीच्या असल्याची त्यांनी कबुली दिली. त्यांनी जुन्नर तसेच आंबेगाव तालुक्याच्या विविध ठिकाणांहून एकूण सहा मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली आहे. त्यांच्या ताब्यातून एकूण ३ लाख ५९ हजार रूपये किमतीच्या एकूण ६ मोटरसायकल जप्त करण्यात आल्या असल्याचे शिळीमकर यांनी सांगीतले.आरोपींकडून खालील गुन्हे उघडकिस आले आहेत.

नारायणगाव पोलीस स्टेशन,आळेफाटा पोलीस स्टेशन, जुन्नर पोलीस स्टेशन आणि घोडेगाव पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत.सदर आरोपींना पुढील कार्यवाहीसाठी नारायणगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे.सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानीक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस हवालदार अनुक्रमे दिपक साबळे,संदीप वारे,राजु मोमीन पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवले,आकाश खंडे यांचे पथकाने केली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img