-1.3 C
New York

Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या घराला मिळणार ‘TOP 5’ सदस्य!

Published:

आजचा भाग ‘बिग बॉस मराठी’चा खूपच रंगतदार असणार आहे. (Bigg Boss Marathi) आज या पर्वातील ‘टॉप 5’ (5 Members) सदस्य कोण हे जाहीर होणार आहे. (Bigg Boss Marathi) त्यामुळे आजचा भाग विशेष असेल. या पर्वाने टीआरपीचे (TRP) सर्वच रेकॉर्ड मोडले आहेत. अंतिम टप्प्यावर आता ‘बिग बॉस मराठी’चा खेळ आता आला आहे. हा खेळ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये ‘बिग बॉस’ म्हणत आहेत,’बिग बॉस मराठी’च्या या सीझनचे टॉप 6 फायनलिस्ट मी जाहीर केले आहेत… आणि इथेच येत आहे एक मोठा ट्विस्ट… आता आपल्याला कळेल कोण आहेत ‘टॉप 5′ बिग बॉस मराठीचे 5 वे पर्व सुरु झाल्यापासून वेगवेगळे धमाके घडत आहेत.

बिग बॉसच्या घरातील अभिजीत सावंत, जान्हवी किल्लेकर, अंकिता प्रभू – वालावलकर , धनंजय पोवार, निक्की तांबोळी आणि सूरज चव्हाण यांच्यापैकी कोणाचा प्रवास आज संपणार याकडे आता प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

Bigg Boss Marathi वर्षा उसगांवकरांनी घेतला निरोप

अंतिम टप्प्यावर ‘बिग बॉस मराठी’चा खेळ आता आला आहे. लवकरच हा खेळ प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. आज मिड वीक एव्हिक्शन पार पडलं असून महाराष्ट्राची लाडक्या वर्षा ताईंनी या घराचा निरोप घेतला आहे. वर्षा ताई जिंकाव्या अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा होती. पण कुठेतरी त्यांचा खेळ कमी पडला. आज कोणाचा प्रवास ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील संपणार याकडे प्रेक्षकांचं आता लक्ष लागलं आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या घराचा निरोप घेतल्यानंतर वर्षा ताई म्हणाल्या,’मला असं वाटलं होतं की मी रेडकार्पेटवर जाईल. फायनलिस्टमध्ये असेन. पण जनतेची इच्छा नियतीची इच्छा शेवटी असते.आज मी घराचा निरोप घेत आहे हे माझ्यासाठी खूप धक्कादायक आहे. शेवटपर्यंत राहण्याची माझी इच्छा होती… पण हरकत नाही. सगळी स्वप्न आपल्या मनाप्रमाणे होत नाही. हा खेळ खेळण्याचं मी धाडस दाखवलं’.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img