राज्यामध्ये गट ब आणि गट क वर्गातील संवर्गांसाठी पुढच्याच आठवड्यापासून पदभरतीला सुरुवात होणार आहे. (Devendra Fadnavis) ही भरती प्रक्रिया राबवण्याबाबात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः माहिती दिली आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी राज्यात अनेक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली होती. राज्य सरकारने गट ब, गट क आणि गट अ वर्गातील पदांसाठी आता पुन्हा भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
एक्स अकाऊंटवरुन पोस्ट करत देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, शासन सेवेतील ‘गट ब आणि क’ पदांसाठीची जाहिरात तत्काळ प्रकाशित करण्यात यावी, यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी माझ्याकडे मागणी केली होती. यासंदर्भात आज एमपीएससी अध्यक्षांना मी फोन करून विनंती केली. त्यांनी येत्या आठवड्यातच ही जाहिरात काढण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. यामुळे इच्छूक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
देवेंद्र फडणवीसांनी कोणता प्रस्ताव दिला? तुतारी हाती घेताच पाटील म्हणाले
Devendra Fadnavis कोणत्या विभागात
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही दिवशी लागू शकते. त्यापूर्वी भरती प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. अनेक विभागांमध्ये राज्य शासनाच्या मोठ्या प्रमाणावर पदं रिक्त आहेत. सरकार कोणत्या विभागात आणि किती पदांसाठी भरती प्रक्रिया राबवणार, हे पुढच्या आठवड्यात स्पष्ट होणार आहे. दरम्यान, यावर आता विधानसभेच्या तोंडावर ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे अशी टीका होण्यास सुरुवात झाली आहे.