मुंबई / रमेश औताडे
संत निरंकारी मिशनच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबर रोजी विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात (Mumbai News) आले. त्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका सामान्य रुग्णालय वाशी, नवी मुंबई परिसर, उरण येथील महाविद्यालये, रेल्वे परिसर, स्वच्छ करण्यात आला.
संत निरंकारी सेवादल व शेकडो निरंकारी भक्तांनी अभियानात भाग घेतला. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ.अजय गडदे, प्रशांत जावडे, सरिता खेरवासिया,विरेंद्र पवार, अनिल शिंदे, पूजा पिंगळे यांनी अभियान यशस्वीरित्या राबविण्यात आले.
प्रचार प्रसार विभागाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक डॉ.दर्शन सिंहजी आणि सेवादलचे क्षेत्रीय संचालक ललीत दळवी, शंकर सोनावणे यांच्या उपस्थितीत व
रेल्वे अधिकारी आर.के.मोदी, गणेश स्वैन, उपेंद्रसिंह डगर, अश्वनी सिंह, विविध गुप्ता,आमदार यामिनी जाधव यांनी सहभाग अभियानात सहभाग घेतला.